About Us

    

आमच्या विषयी थोडक्यात,

स्पर्धेच्या युगात टिकूण रहायचं असेल तर, माणसाला स्वत:ला बदलावे लागते व परिवर्तन होणे गरजेचे असतं. परिवर्तन ही काळाची गरज आहे. सध्याच्या युगात कोणता ट्रेंड लोकांना आवडेल याचा काही नेम नाही. मिडीया क्षेत्रात काम करत असतांना सर्व्हेक्षणानुसार असे लक्षात आले की व्यवसाईकदृष्टया विचार केल्यास देशात इलेक्ट्रॉनिक मिडीया ही फायदयामध्ये आहे. थोडक्यात सांगायचे झाले तर इलेक्ट्रॉनिक मिडीयाला अच्छे दिन सध्या तरी आहेत हे मात्र नक्की, परंतू या डिजीटल युगामध्ये प्रिंट मिडीया ही कोलमडून पडली आहे असे दिसून येते. त्यात सोशल मिडयायाचा अतिरेक होत असल्याने प्रिंट मिडीयाला बुरे दिन आल्याचे स्पष्ट होते असे सर्वांनाच वाटते ! मात्र प्रिंट मिडीयाची तुलना इतर कोणत्याही मिडीयासोबत केली तर जेवढया प्रमाणात जनतेची विश्वासार्हता प्रिंट मिडीयामध्ये म्हणजेच वृत्तपत्रामध्ये आहे तेवढया प्रमाणात इतर कोणत्याही मिडयावर लोकांचा विश्वास नाही. हे मी ठामपणे सांगू शकतो. मी स्वत: गेली काही वर्षे पत्रकारीता करत असतांना जे चांगले वाईट अनुभव आले ते दोन्ही अनुभव मला बरंच काही शिकवून गेले. जनतेला काय हवं आहे. आणि जनतेला काय मिळत आहे. यामधल्या फरकामुळे अनेकांची पत्रकरीता व या क्षेत्रात काम करणे जास्त काळ टिकत नाहीत असे दिसून आले व या क्षेत्रात अनेकांना काम करणं ही डोकेदुखी होऊन बसले आहे. सतत समाजावर होणारे अन्याय पहावत नव्हते. मी तर हाडामासाचा माणूस, माझा देहच मुळात भावनिक त्यात निष्पाप जनतेवर अन्याय झालेला सहन होणं म्हणजे कठीणच. अन्यायाला वाचा फोडण्यासाठी व समाजाला आपण काही देणं लागतो याचा तंतोतंत विचार केला, गाढ अभ्यास केला. व स्वत:च या सध्या प्रिंट मिडीयामध्ये स्वत:च उतरण्याचं ठरवलं. जयवंती टाईम्स् या नावाने स्वत:च एक वृत्तपत्र सुरू करण्याचं ठरलं. आपल्या सर्वांच्या साक्षीनं, आपल्या सर्वांच्या सहकार्यानं, मार्गदर्शनाखाली आपल्या सर्वांच्या शुभेच्छा घेऊन या क्षेत्रामध्ये जनतेच्या विश्वासाला तडा न जाता उभं रहायचं आहेच. एक जबाबदार संपादक या नात्याने मी जनतेचा विश्वास कायम राखून ठेवेन असे आपणास वचनबध्द करतो. जनतेचा विश्वास जिंकून, वाचकांना नवनविन वाचनीय साहित्य, घडामोडी, आग्रलेख, शैक्षणिक, क्रिडा, शेतीविषयक, मनोरंजन इ. विषयांवर आधारीत विविध साहित्य माझ्या या वृत्तपत्राच्या माध्यमातून मी आपणा सर्वांपर्यंत पोहचवणार आहे. फक्त आपली साथ, मार्गदर्शन व आपल्या शुभेच्छा व नेहमी माझ्या सोबत असू दया तसेच आपल्या आशिर्वादाची थाप पाठीवर असु दया हीच आपल्या सर्वांकडे हक्काची मागणी.

- सौ. स्वाती शंकर चव्हाण (संपादक)

Follow Us On Social

Like Follow us on Twitter

Contact Us

"Jaywanti Times"

Office : N P Complex Block No. 42 Ambajogai , District Beed, Maharashtra State, India Pin : 431517

Address:| Ambajogai | Beed | Maharashtra |
Telephone: +91-02446-248602
FAX: +91-02446-248602
Mobile : +91 - 9921042422, 7588179788
E-mail: jaywantitimes@gmail.com