स्वाभिमानीच्या बीड जिल्हा प्रवक्तेपदी प्रकाश बोरगावकर

अंबाजोगाई
 स्वाभिमानी शेतकरी संघटना व स्वाभिमानी पक्षाच्या बीड जिल्हा प्रवक्तेपदी सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रामध्ये कार्यरत असणारे तालमार्तंड प्रकाश बोरगावकर यांची नियुक्ती खा.राजु शेट्टी यांच्या आदेशानुसार करण्यात आली आहे .तालमार्तंड प्रकाश बोरगावकर यांचा मराठवाडा , पश्चिम महाराष्ट्र व विदर्भात मोठ्या प्रमाणात शिष्य परीवार आहे .संगीत क्षेत्रातील त्यांच्या विशेष कार्यासाठी अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे ..संगीत क्षेत्राबरोबरच सामाजिक कार्यातही त्यांचे मोलाचे योगदान असते .सामजिक क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक संस्थांशी त्यांचे निकटचे समंध आहेत , अनेक वर्ष ते पत्रकार म्हणुनही कार्यरत होते .जनतेच्या अनेक जिव्हाळ्याच्या प्रश्नावर त्यांनी पत्रकारीतेतुन आवाज उठवला होता.स्पष्ट आणि परखड वक्ता म्हणुन प्रकाश बोरगावकर यांची सर्वत्र ख्याती आहे .त्यांच्या या सामाजिक व सांस्कृतिक कार्याची दखल घेउन मा.खा.राजु शेट्टी यांनी त्यांच्यावर बिड जिल्हा प्रवक्तेपदाची जबाबदारी सोपवली आहे , बीड येथे झालेल्या स्वाभिमानीच्या कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे व ईतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये प्रकाश बोरगावकर यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. या प्रसंगी माजलगाव ता.अध्यक्ष अमित नाटकर, गेवराई ता.अध्यक्ष राजेंद्र डाके पाटील,पाचेगाव सर्कल प्रमुख उद्धव साबळे,माजलगाव येथील रामप्रसाद काळे, मुंजाभाऊ घायतीडक ,आदी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. प्रकाश बोरगावकर यांच्या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *