ज्येष्ठ नागरिक संघाने केला दिव्यांग क्रिकेटपटुंचा सन्मान

अंबाजोगाई

ज्येष्ठ नागरिक संघ अंबाजोगाई यांच्या  वतीने औरंगाबाद येथे राष्ट्रीय स्पर्धेत विजेता ठरलेल्या महाराष्ट्र दिव्यांग क्रिकेट संघातील खेळाडूंचा सन्मान केला.

 ज्येष्ठ नागरिक संघाने रविवार,दि. 31 मार्च रोजी आयोजित बैठकीत महाराष्ट्र दिव्यांग क्रिकेट संघाने सातत्यपुर्ण कामगिरी केल्याबद्दल सन्मान केला.यात दिव्यांग संघाने सन 2009,सन 2012,सन 2013 ते 2015 व सन 2019 या कालावधीत नाशिक, मुंबई आणि औरंगाबाद येथे झालेल्या दिव्यांग क्रिकेट पटुंच्या स्पर्धेत उज्वल कामगिरी केली. त्याबद्दल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष संजय चव्हाण, उपाध्यक्ष ज्योतीराम घुले,प्रशिक्षक खुशाल परदेशी,करीम पटेल (शिर्डी),सुनिल सायबेडे (नाशिक) या खेळाडूंचा यावेळी सत्कार केला. सदरील संघातून ज्योतीराम घुले (बीड) व जमिर पठाण (अहमदनगर) या खेळाडूंची निवड राष्ट्रीय संघामध्ये झाली आहे. ही दिव्यांग क्रिकेट पटुंचा संघ सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र खेडगीकर यांच्या पुढाकाराने स्थापन झाला असून संघाला नेहमीच ज्येष्ठ नागरिकांचे पाठबळ मिळालेले आहे.
ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने फेस्कॉनचे उपाध्यक्ष डॉ.डी.एच. थोरात,ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष पुंडलिक पवार,सचिव मनोहर कदम,कार्याध्यक्ष अ‍ॅड.अनंतराव जगतकर,जनार्धन मुंडे, कोषाध्यक्ष धनराज मोरे, कमलताई बरूरे,इंदु पोटपल्लेवार आदींनी दिव्यांग खेळाडूंचा शाल व पुष्पगुच्छ देवून यावेळी सन्मान केला.
या प्रसंगी ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव मनोहर कदम यांनी मनोगत व्यक्त केले.तर सुत्रसंचालन सहसचिव पद्माकर सेलमोकर यांनी करून उपस्थितांचे आभार कोषाध्यक्ष धनराज मोरे यांनी मानले.या प्रसंगी ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य व शहरातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *