पाच वर्षानंतरही जोडवाडीचे आत्महत्याग्रस्त कुटुंब दुर्लक्षीतच, आधार माणुसकीच्या उपक्रमातुन संसारपयोगी साहीत्याचे कुटुंबाला वाटप

अंबाजोगाई

सततची नापिकी आणि दुष्काळ पाचवीला पुजलेला या विवंचनेतुन अंबाजोगाई तालुक्यातील जोडवाडी येथील गोविंद प्रल्हाद इंगळे यांनी पाच वर्षापुर्वी आत्महत्या केली होती. इंगळे कुटुंब पाच वर्षापासुन समाजापासुन ते शासनाच्या येजनेपासुन दुर्लक्षीतच आहे. या दुर्लक्षित कुटुंबाला आधार देण्यासाठी आधार माणुसकीचा उपक्रमाचे अॅड. संतोष पवार यांनी पुढाकार घेतला असुन या कुटुंबाला संसारपयोगी साहित्य देऊन या कुटुंबाला प्रवाहात आनण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. योगेश्वरी देवल कमेटी यांच्या कडे चौधरी कुटुंबाने जमा केलेले संसार उपयोगी साहित्य “आधार माणुसकीचा” याच्याकडे गरीब कुटुंबास देण्यासाठी देण्यात आले होते.
अंबाजोगाई तालुक्यातील जोडवाडी येथील गोविंद प्रल्हाद इंगळे यांना कोरडवाहु दीड एक्कर जमीन आहे. सततची नापिकी व दुष्काळ त्यात चार मुलीचा सांभाळ कसा करावा या विवंचनेतुन २७ नोव्हेंबर २०१४ रोजी आत्महत्या केली होती. गोविंद इंगळे यांना चार मुलीच असुन त्यांची पत्नी मिनाताई यांच्यावर मुलीचा सांभाळ येऊन पडला आहे. सध्या मोठी मुलगी शितलने अकारावीची परीक्षा दिली असुन आश्विनी ६ वी, पुजा ३ री, मयुरीने १ लीची परीक्षा दिली आहे. दीड एक्कर कोरडवाहु शेतीतुन कुटुंबाचा गाडा कसा हाकायचा आणि मोठ्या मुलीचेे लग्न कसे करावा हा प्रश्न त्या मातेसमोर उभा टाकला आहे. गावात घर नाही म्हणुन मिनाबाईने शेतातच पत्र्याचा डब्बा ठोकुन राहायला गेले आहेत. शेतात काही नसल्यामुळे त्या रोजंदारीवर मोलमजुरी करुन कुटुंबाचा गाडा हाकत आहेत. पतीच्या मृत्युनंतर कुटुंबाचा गाडा हाकताना कमालीची कसरत करावी लागत आहे. हे कुटुंब मोठ्या हालाखीचे जीवन जगत असल्याची माहीती मिळाल्यानंतर आधार माणुसकीचे अॅड संतोष पवार यांनी त्यांच्या गावात जाऊन कुटुंबाची आस्थेवाईकपणे चौकशी केली. आणि रविवारी त्या कुटुंबाला संसारपयोगी साहित्य दिले. आणि मुलीच्या लग्नाची चिंता करु नका आमची संस्था लोकसहभागातुन मुलीचे लग्न लाऊन देऊ असे आश्वासन दिल्यानंतर त्या मातेच्या चेहर्यावर आनंद आश्रु आले. या कुटुंबाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समाजाने पुढाकार घेतला पाहीजे हीच अपेक्षा या कुटुंबाची आहे.
*शासनाच्याा योजनेेेेपासुन हे कुटुंब दुर्लक्षीतच*
बेघरांना घर, घर तिथे शौचालय या योजना आजही गरजुवंताना मिळत नाहीत. ही वस्तुस्थिती आहे. शासनाच्या योजना आम्हाला मिळाल्या नसल्यातरी मला कुटुंबाचा गाडा हाकण्यासाठी कायमस्वरुपी मला स्वयंरोजगाराची आवश्यकता आहे. मिनाताई इंगळे, चार मुलीची आई, जोडवाडी.

लोकसहभागातुन कुटुंबाला आधार देऊ
आधार माणुसकीचा उपक्रमातुन देवळा, सारसा येथील आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुलीचे लगण लावुन दिले आहेत. यासाठी दानशुर व्यक्ती व गावातील नागरीकांचा पुढाकारातुन हे शक्य झाले. इंगळे कुटुंबातील मुलीचे लग्न देखील याप्रमाणे करण्यासाठी आधार माणुसकीचा उपक्रम पुढाकार घेईल. आधार माणुसकीचा उपक्रमातून जवळपास 225 मुलांच्या शिक्षण व आरोग्यासाठी लोकसहभागातून मदत उभी करून सहकार्य करण्यात येत आहे, तसेच या कुटुंबाना शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी सहकार्य करण्यात येते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *