2 लाख 41 हजार रुपयांची दारू केली नष्ट..!

अंबाजोगाई

अंबाजोगाईच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाची बुट्टेनाथ खो-यात कारवाई

शहरालगतच्या बुट्टेनाथ खो-यात अवैधरित्या सुरू असलेल्या हातभट्टी केंद्रांवर गुरूवार,दि.11 एप्रिल रोजी राज्य उत्पादन शुल्क, अंबाजोगाई विभाग निरीक्षकांच्या पथकाने धाड टाकून तब्बल 2,41,150/-रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून तो जागेवरच नष्ट केला असल्याची माहीती प्रभारी निरीक्षक अनिल गायकवाड यांनी दिली.

देशात सध्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू आहे.त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात विविध ठिकाणी अवैध हातभट्टी केंद्रांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या गेल्या दोन महिन्यांपासून वतीने धाडी टाकण्यात येत आहेत.आता पर्यंत नऊ ते दहा लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करून तो जागेवरच नष्ट केला.तसेच अनेकांवर गुन्हेही दाखल करण्यात आले.राज्य उत्पादन शुल्क अंबाजोगाई विभागातर्गंत वडवणी, केज,माजलगाव, धारूर,परळी, अंबाजोगाई हे तालुके येतात त्यामुळे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांचे सुचनेनुसार व राज्य उत्पादन शुल्क बीडचे अधिक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या अवैध दारू विक्री, हातभट्टी केंद्रांवर कारवाई करण्यात येत आहे.याच कारवाई अंतर्गत बुटेनाथ दरी (ता.अंबाजोगाई) या ठिकाणी हातभट्टी ठिकाणांवर धाडी टाकून सहा गुन्हे नोंदवले.सदर ठिकाणी आरोपी मिळून न आल्याने महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 अंतर्गत बेवारस गुन्हे नोंदविण्यात आले.
टाकलेल्या धाडीत रसायनाने भरलेले ५३ लोखंडी बॅरल,
हातभट्टी दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे मळी पासून बनलेले रसायन 10,915 लिटर असा एकूण 2,41,150/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून तो तात्काळ जागेवरच नष्ट करण्यात आला.या कारवाईत राज्य उत्पादन शुल्क, अंबाजोगाई विभागाचे प्रभारी निरीक्षक अनिल गायकवाड,दुय्यम निरीक्षक अनिल पिकले,एस.बी.शेळके,जवान बी.के.पाटील, आर ए.जारवाल,एस. व्ही.लोमटे व वाहनचालक के.एन.डुकरे यांनी सहभाग घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *