वाढदिवसानिमित्त नगरसेवक वाजेद खतीब यांचे श्रमदान

अंबाजोगाई

अंबाजोगाई नगर परिषदेतील प्रभाग क्र. 9 मधील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नगरसेवक वाजेद खतीब यांनी बुधवार,दि. 10 एप्रिल रोजी वाढदिवसानिमित्त स्वतः श्रमदान करून प्रभागातील स्वच्छतेसाठी पुढाकार घेतला. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

येथील बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांचे कट्टर समर्थक नगरसेवक वाजेद खतीब यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवार रोजी सकाळी 5.30 ते 10.30 या वेळेत प्रभाग क्रमांक 9 मध्ये स्वच्छतेसाठी पुढाकार घेतला.स्वतः नालेसफाई,कचरा संकलन व प्रभागात पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यांच्या या प्रयत्नांचे कौतुक होत आहे.प्रभाग क्रमांक 9 मध्ये गुरूवार पेठ, खंडोबा मंदीर,शितला माता मंदिर परिसर, वारीक गल्ली,सिद्धार्थ नगर,हमाल गल्ली, हवळे गल्ली,चांभार गल्ली या परिसरात हे स्वच्छता अभियान व श्रमदान करण्यात आले. या कामी नगरसेवक वाजेद खतीब यांना या प्रभागातील नागरिक नवनाथ हुलगुंडे,संतोष माने,पंडीतराव हुलगुंडे, एजाज लाला,सय्यद रशिद,बाळासाहेब बंडगर,दिलीप जगताप, वसंत जगताप,दिलीप सुरवसे,शिल्पा अशोक बंडगर तसेच नगरपरिषदेतील स्वच्छता विभागाचे कर्मचारी विकास जोगदंड, नारायण होके, शेख अकबर आणि त्यांच्या सहकार्य कर्मचार्‍यांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *