मंगईवाडी येथिल आत्महत्याग्रस्त शिंदे कुटुंबास व्यापाऱ्यांनी दिला माणुसकीचा आधार

अंबाजोगाई
मंगई वाडी ता अंबाजोगाई येथील शेतकरी रामदास अण्णा शिंदे यांनी 2016 मध्ये आत्महत्या केली, त्या नंतर या कुटुंबातील त्यांची पत्नी मोलमजुरी करून कुटुंबाचा गाडा मोठया मुश्कील पणे चालवत आहेत , मुलांचे शिक्षण करतांनाच्या अडचणी, राहायला कुडाचे घर,रोजगाराच्या संधी उपलब्ध नसल्याने आर्थिक परिस्थिती बिकट आहे,परंतु यातूनही मार्ग काढत मुलांच्या शिक्षणासाठी आग्रही भूमिका मुलांची आई संजीवनी ताई यांची आहे.
               या कुटूंबाची व्यथा अनेक वर्तमानपत्र।मधून प्रसिद्ध झाल्या नंतर आधार माणुसकीचा उपक्रमाचे प्रमुख ऍड संतोष पवार यांच्या मार्फत या कुटुंबास संपर्क करून अंबाजोगाई येथिल व्य।पारी व नागरीकांनी या कुटुंबास अन्नधान्याची(ज्वारी-50,गहु-25, तांदुळ;10 किलो प्रमाणे), घरांवर निवारा करण्यासाठी सात पत्रे,नऊ बांबू या साहित्यांची मंगळवारी मदत केली, तसेच मुलांच्या शिक्षणासाठी भविष्यात मदत करण्याचे आश्वासन दिले, या वेळी या कुटुंबास मदतीचा हात देण्यासाठी ऍड अशोक कवडे, भारत मूळे पाटील, वसंतराव थोरात, विष्णुपंत शेप,आण्णासाहेब काटे,रवी भन्साळी,देविदास कोंबडे,गणेश बरकते, राजाभाऊ कोंबडे,विठ्ठल पळसे,संतोष मालपाणी, अशोक पाटील, परमेश्वर भिसे,अशोक कदम,सुखदेव देवकते यांनी पुढाकार घेतला.
                    सक्षम नागरिकांनी अश्या वंचित कुटुंबातील समस्या सोडवण्यासाठी  व मुलांच्या शिक्षणासाठी लागणारे मार्गदर्शन व आर्थिक सहकार्य करण्यासाठी मदतीचा हात पुढे करण्याची आवश्यकता आहे.
                         या कुटुंबातील मुलांनी खूप शिक्षण घेऊन भविष्यात आईचे व वडिलांचे स्वप्नं पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करुन अधिकारी होणार असल्याचे आत्मविश्वासाने सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *