शेतकरी आत्महत्याग्रस्त पेदे कुटुंबास मिळाला मदतिचा हात

अंबाजोगाई
मौ.तळेगांव ता.अंबाजोगाई येथील  शेतकरी-शेतमजूर नागनाथ महादू पेदे यांनी मार्च 2017 मध्ये विवाहीत मुलींच्या लग्न।तीलं कर्ज, दुसऱ्या मुलींच्या लग्न।ची चिंता,मुलांचे शिक्षण,समोर उभे असलेले आर्थिक संकट या विवेचनेतून आत्महत्या केली.
         पेदे कुटुंब मुळचे पानगांवचे परंतु 20 वर्षी पुर्वी मजुरीच्या निमित्ताने तळेगांव या ठिकाणी राहण्यास आलेले.
         या कुटुंबास केवळ 1 एकर 3 गुंठे जमीन,त्यापैकीं केवळ अर्धा एकरच जमीन कुटुंबातील वादामुळे त्यांचा ताब्यात आहे.विटा रचलेले राहते घरही तेही नांवावर नाही,शासनाच्या योजनांपासून वंचित असलेले पेदे कुटुंब. या कुटुंबाची पाण्यासाठी व रोजगारा उपलब्धता साठी खूपच त्रेधा होत आहे,मिळेल ती मोल-मजुरी करून शामलबाई कुटुंबाचा गाडा चालवित आहेत.
      कु.नेहा ही बर्रदापुर येथे 12 वी मध्ये शिक्षण घेते,तर महादेव हा गावातील शाळेत 9 मध्ये शिक्षण घेत आहे.मागील आठवड्यात आधार माणुसकीचा उपक्रमांचे प्रमुख ऍड संतोष पवार यांनी या कुटुंबाची भेट घेतली, तेंव्हा या कुटुंबातील अडचणी सोशल मीडियावर मांडल्या असता ही बाब हेलपिंग हँड ग्रूपच्या सौ प्रज्ञा
अपेगांवकर-सरवदे यांच्या निदर्शनास आली,त्यांनी धनराज पवार यांना संपर्क करून, या कुटुंबास हेलपिंग हॅन्डच्या वतीने मदत करण्यासाठी मदतीचा हात पुढे केला.
          गुरुवारी तळेगांव येथे जाऊन      या कुटुंबाची भेट घेऊन त्यांना महिनाभराचे संपुर्ण किराणा साहीत्य भेट देण्यात आले,तसेच या कुटुंबास पाणी खूप अंतरावरून आणावे लागत असल्याने पाणी आणण्यासाठी सायकलची मदत श्री परमेश्वर भिसे यांनी करण्याचे आश्वासन दिले.या कुटुंबातील मुलांना आधार माणुसकीच्या उपक्रमांतुन शिक्षण व आरोग्यासाठी मदत करण्यात येत आहे,भविष्यात  नेहाच्या विवाहसाठी लोकसहभागातून सहकार्य करण्यात येईल असा कुटुंबास धीर दिला.
       प्रशासनाने अश्या कुटुंबास शासकीय योजनेचा तात्काळ लाभ देण्याची आवश्यकता आहे,तसेच सदन वेक्तींनी अश्या वंचित कुटुंबाच्या पाठीशी उभे राहण्याची आवशक्त। आहे.
                  या प्रसंगी उपस्थित प्रज्ञा         अपेगावकर-सरवदे,सौरभ कर्णावट, योगेश सावध,श्री परमेश्वर भिसे,श्री गोविंद सूर्यवंशी (पत्रकार,बर्रदापुर),ऍड संतोष पवार.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *