डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता पुरस्काराने बालासाहेब सोनवणे सन्मानित

अंबाजोगाई

अंबाजोगाई (रणजित डांगे) येथील शिक्षक व सामाजिक कार्यकर्ते बालासाहेब सोनवणे यांना प्रतिष्ठेचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता पुरस्कार नागपुर येथे शनिवार,दि.22 जून रोजी दुसरे एकपात्री प्रबुद्ध नाट्य संमेलनात प्रदान करण्यात आला. पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कल्याण महासंघ व मित्र परिवाराच्या वतीने बालासाहेब सोनवणे यांचे अभिनंदन होत आहे.

  • बालासाहेब सोनवणे हे एक विद्यार्थीप्रिय, अभ्यासू शिक्षक आहेत. शिक्षक बांधवांना व विविध शासकीय कार्यालयातील कर्मचार्‍यांना न्याय मिळवून देण्यासाठी विविध लढे,आंदोलने उभारणारे लढवय्ये नेते म्हणुन ही ते परिचित आहेत.सामाजिक क्षेत्रातही त्यांनी उल्लेखनिय कार्य केलेले आहे.वंचित,दु:खित, पिडीत विद्यार्थी, समाजासाठी आणि व्यक्तींसाठी बालासाहेब सोनवणे हे अखंड कार्य करीत आहेत. अंबाजोगाई शहरातील प्रवर्तनवादी चळवळीत काम करणारे ते एक प्रमुख शिलेदार आहेत. त्यांच्या या सर्वंकष कार्याची नोंद घेवून महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ व अखिल भारतीय प्रबुद्ध नाट्यपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार,दि.22 जून रोजी पवार सभागृह, कुकडे ले-आउट, चंद्रमणीनगर गार्डन समोर नागपुर या ठिकाणी आयोजित दुसरे एकपात्री प्रबुद्ध नाट्य संमेलनात उदघाटक अरूण गाडे (अध्यक्ष,कास्ट्राईब महासंघ),संमेलन अध्यक्षा डॉ.वृशाली रणधीर,संमेलन स्वागताध्यक्ष प्रगतीताई पाटील,प्रमुख पाहुणे भिमपुञ टेक्सास गायकवाड,डॉ. किर्तीपाल गायकवाड, सुधीर शंभरकर,प्रा.रमेश पिसे,भीमराव गणवीर, संयोजक संजय सायरे,महेंद्र माणके व सिद्धार्थ उके या मान्यवरांच्या हस्ते व प्रमुख उपस्थितीत बालासाहेब सोनवणे यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह,सन्मानपत्र,पुष्पगुच्छ असे आहे. पुरस्कार निमित्ताने देण्यात आलेल्या सन्मानपत्रावर नमुद करण्यात आले आहे की,आपण भारतीय संविधानात अपेक्षिलेल्या ‘समता’ या मानवी मुल्याच्या प्रस्थापनेसाठी आयुष्यभर प्रयत्नरत आहात.आपल्या कार्याचा गौरव म्हणुन आपल्याला ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता पुरस्कार’ प्रदान करताना आम्हाला आनंद होत असल्याचे म्हटले आहे.हा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल बालासाहेब सोनवणे यांचे महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कल्याण महासंघाचे शिंदे प्रमोद (वि.संघटक),एम.एम. गायकवाड (जिल्हा सहसचिव),डॉ.खळगे, साहेब,प्रा.रवि आचार्य, डि.एन.गायकवाड, वाघमारे धनंजय,विष्णू मस्के,बप्पाजी कदम, गौतम जोगदंड,सोनेराव लगसकर,लोखंडे रमेश, शालन जोगदंड,भुंबे मंगल,संतोष बोबडे, शेख युनूस,पतकराव, बी.एन.गायकवाड, प्रल्हाद गडदे,ढोणे गंगाधरजी,वाघ सर, कांबळे मोहन,संभाजी गडदे,शंकर गडदे, बळीराम अकुसकर, रामराजे तोडकर,प्रविण मोरे, दादासाहेब पवार, विलास गंगणे यांच्यासह नातेवाईक,मित्र परिवार आदींनी अभिनंदन केले आहे.
    ============================

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *