गुरुदेव विद्यालय मोरेवाडी याठिकाणी क्रांती दिना निमित्त वक्तृत्व स्पर्धा व वेशभूषा स्पर्धा संपन्न

अंबाजोगाई

बनेश्वर शिक्षण संस्था संचलित गुरुदेव विद्यालय मोरेवाडी या ठिकाणी 9 ऑगस्ट क्रांती दिना निमित्त शालेय विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व व क्रांतिकारकांची वेशभूषा स्पर्धेचे संस्कृतीक विभागाच्यावतीने आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. काकडे एस. एस. तर प्रमुख अतिथी म्हणून आदर्श क्रीडाशिक्षक गोरे मनेष यांची उपस्थिती होती. वक्तृत्व स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून इतिहास तज्ञ श्री तेलंग सूर्यकांत व मराठी विभाग प्रमुख सौ मोरे संगीता यांनी काम पाहिले तर वेशभूषा स्पर्धेसाठी सौ कोणाळे सोनाली ,शिंदे बाळासाहेब यांनी परीक्षण केले . या दोन्ही स्पर्धेमध्ये शालेय विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता. झाशीची राणी लक्ष्मीबाई, अहिल्यादेवी होळकर, सावित्रीबाई फुले यासह अनेक वेशभूषा मध्ये विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले .
वकृत्व स्पर्धेमध्ये स्पर्धक विद्यार्थ्यांनी विविध क्रांतिकारी चळवळीतील नेतृत्वाचे वर्णन करून त्यांच्या कार्याची माहिती सर्वांना दिली .या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन इंग्रजी विषय तज्ञ श्री चव्हाण पंडित यांनी केले .यशस्वी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिका व प्रमुख अतिथींच्या हस्ते पारितोषक वितरण करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री प्रकाश बोरगावकर ,श्री इंगळे दीपक, श्री शेरे नामदेव, श्री विजय भिसे, सौ सरवदे मॅडम सौ जगताप मनीषा यांनी परिश्रम घेतले तसेच श्री बापू खेडकर ,श्री पवार सुग्रीव यांनीही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विशेष योगदान दिले. शेवटी आभार आदर्श क्रीडाशिक्षक श्री गोरे सर यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *