भोईराज अश्वकल्याण समितिने केले वृक्षारोपन”

अंबाजोगाई

“परळीवेस येथे युवा ग्राम व ब्रुक इंडिया दिल्ली संचलित महाराष्ट्र बि.के.मोबाईल युनिट बिड यांच्या सहकार्याने परळीवेस येथील विटभट्यावर भोईराज अश्वकल्याण समितीने एक्कावन झाडे लावली. या वेळी युवा ग्रामचे अध्यक्ष एच.पी.देशमुख, डॉ. सचिन चिंचोलिकर,प्रकाश आरकडे,राधे जगताप,महेश अंबेफोड, डॉ प्पपु माने , मनिषा वाघमारे परिसरातील समाजसेवक भिकाजी खैरमोडे, परमेश्वर जोगदंड,परमेश्वर रंधवे,विनोद हुशारे,वैजनाथ खंडागळे, लक्ष्मण हुशारे, राधाकीशन हुशारे, बळिराम डाके पशुमालक व महिला उपस्थित होते
परळीवेस परिसरात विटभट्या जास्त प्रमाणात आहेत या उद्योगात गाढव या प्राण्यांचा विटा वाहण्यासाठी वापर केला जातो भर उन्हाळ्यात कामे चालतात व विटभट्यावर सावलीच्या कमतरतेमुळे पशुंना तसेच कामगारांना उन्हाचा त्रास होतो तसेच प्रत्येक विटभट्यावर दहा झाडे लावली पाहिजे कारण प्रदूषण नियंत्रण ठेवणे करण्यासाठी हि झाडे लावली पाहिजेत व पाणी घालून जगविली पण पाहिजेत उपस्थित भटीमालक तसेच पशुमालकांना जास्त प्रमाणात झाडे लावण्याचे आव्हान डॉ. सचिन चिंचोलीकर यांनी या कार्यक्रमात केले व भोईराज अश्वकल्याण समितीचे आभार मानले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *