कोल्हापुर पुरग्रस्तांच्या मदतीसाठी स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाचे ३० डॉक्टरांचे पथक रवाना

अंबाजोगाई

अतिवृष्टीमुळे कोल्हापुर येथे उद्भवलेल्या पुरपरिस्थितीत अडकलेल्या लाखो नागरीकांवर वैद्यकीय उपचार करण्यासाठी स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयातील तीस तज्ञ डॉक्टर परीचारीकांचे एक पथक रवाना करण्यात आले असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी दिली.
कोल्हापूर येथे निर्माण झालेल्या पुरपरिस्थितीत कोल्हापुर जिल्ह्यातील जे नागरिक अडकलेले आहेत अशा लोकांना तातडीने वैद्यकीय उपचार मिळण्यासाठी या वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय पथक तातडीने रवाना करण्यात यावे अशा सुचना वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन व वैद्यकीय संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी दिलेल्या सुचनेनुसार हे पथक पाठवण्यात आले आहे. या वैद्यकीय पथकात २३ तज्ञ डॉक्टर, ५ परिचारिका आणि २ चालकांचा समावेश आहे. या पथकात डॉ. निखील काळे, डॉ. प्रशांत शिंदे, डॉ. प्रभाकर बिचकाटे, डॉ. संकेत वैद्य, डॉ. सागर मावळे, डॉ. सौहराम शकील, डॉ. किशोर मुखमले, डॉ. कौशीक अन्सारी, डॉ. दत्तात्रय नागरखेडे, डॉ. आशफाक सैय्यद, डॉ. मोहीत विश्वकर्मा, डॉ. शरद शेळके, डॉ. विजयकुमार पवार, जे. कृष्णन राहुल बागल, पवन राठोड, डॉ. अविनाश मुंडे, सागर माने, आकाश वराडे आणि डॉ. पुष्पदंत रुग्ये यासह चित्रलेखा बांगर, आशा सोनवणे, पुर्वा दहिफळे, आशा यादव, सैय्यद नजीर या पाच स्टाफ व राऊत सह अन्य एका चालकांचा समावेशक आहे.
आज सकाळी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, रुग्णालयाचे आधिक्षक डॉ. राकेश जाधव, इएनटी विभाग प्रमुख डॉ. प्रशांत देशपांडे, डॉ. विनोद वेदपाठक, वैद्यकीय अधिकारी डॉ. नागेश अब्दागिरे, डॉ. योगेश, मेडिसीन विभागातील सहयोगी प्राध्यापक डॉ. सचीन चौधरी, मेट्रन उषा भताने यांच्यासह रुग्णालयाच्या अभ्यागत मंडळाचे सदस्य प्रशांत आदनाक, रँगीन प्रतिबंधक समितीचे सदस्य सुदर्शन रापतवार, सुरक्षा समितीचे सदस्य रमाकांत पाटील, सामाजिक कार्यकर्ते संजय दौंड, पत्रकार अ.र. पटेल, अविनाश मुडेगावकर, जगन सरवदे, परमेश्वर गीत्ते, अभिजित जगताप, नंदकुमार पांचाळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *