कर्तव्याच्या माध्यमातुन आदर्श निर्माण करणे हीच भाशिप्र संस्थेची खरी ओळख-डॉ.सुरेंद्र आलुरकर

अंबाजोगाई

खोलेश्वर महाविद्यालयात डॉ. उमा उदय आसरडोहकर यांचा सेवागौरव समारंभ
============================
अंबाजोगाई (प्रतिनिधी) शिक्षण क्षेत्रात काम करताना आपण जबाबदारीचे कर्तव्य पार पाडताना सद्‌गुण आणि करिअर घडवले तर खऱ्या अर्थाने अशी माणसं सेवानिवृत्तीनंतरही मागे
आदर्श ठेवुन जातात आणि त्यांचा हा आदर्श नविन माणसं घेतात. भाशिप्र संस्थेची समाजात वेगळी ओळख असुन इथे काम करणारा शिक्षक, प्राध्यापक किंवा कर्मचारी सेवानिवृत्त होवुन बाहेर पडल्यानंतरही उर्वरीत आयुष्यात समाजात संस्कारमय कर्तृत्व दाखवतो.त्यामुळे त्याचा नेहमीच अभिमान वाटतो या शब्दांत संस्था अध्यक्ष डॉ.सुरेंद्र आलुरकर यांनी हिंदी विभागाच्या डॉ.सौ.उमा उदय आसरडोहकर यांच्या सेवागौरव समारंभ कार्यक्रमात त्यांनी दिलेल्या योगदानाचे कौतुक केले.

लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाशिप्र संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुरेंद्र आलुरकर तर व्यासपीठावर केंद्रिय कार्यकारिणी सदस्या
डॉ.सौ.कल्पनाताई चौसाळकर,केंद्रिय कार्यकारिणी सदस्य
आप्पाराव यादव, स्थानिक व्यवस्था मंडळाचे अध्यक्ष अॅड. किशोर गिरवलकर, महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष
राम कुलकर्णी,उदय आसरडोहकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. सुरूवातीला महाविद्यालयीन कर्मचारीवृंद आणि इतर विभागाच्या वतीने सेवानिवृत्ती निरोप देताना प्रा.सौ.उमा आसरडोहकर यांचा अनेकांनी सत्कार केला.सत्काराला उत्तर देताना प्रा.सौ.उमा आसरडोहकर म्हणाल्या की,सेवानिवृत्ती आणि आजपासुन महाविद्यालयापासून दुरावणे हा विरह सहन होत नाही.असे सांगून त्यांनी मागील सत्तावीस वर्षांतील अनेक आठवणींना उजाळा दिला.भाशिप्र संस्था माझ्या आयुष्याला वेगळं वळण देणारी ठरली.ज्यातून मी बरंच काही शिकले.ज्यांनी सहकार्य केले.त्यांच्या नावाचा नामोल्लेख करून त्यांनी जाहीर कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी उपप्राचार्य डॉ.मुकूंद देवर्षी यांनी प्रास्ताविक करताना यावेळी काही प्रसंग सांगितले तर प्रा. बिभीषण फड,प्रा. दिगांबर मुडेगावकर, विजय कांबळे,सौ. अनिता बर्दापुरकर यांनीही शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले.या प्रसंगी राम कुलकर्णी म्हणाले की,जीवनात शुद्ध कर्म असेल तर सर्व पातळीवर यश मिळतं. महाविद्यालय हा आपला आत्मा आहे. अंतरंग होवुन व्यवस्थितरीत्या जबाबदारी पार पाडली तर खरं नातं भावनेचं होतं.अॅड.किशोर गिरवलकर यांनी शुभेच्छा देताना सांगितले की,असे काही प्राध्यापक ज्यांचा आदर्श खरंच घेण्यासारखा आहे. डॉ.कल्पनाताई चौसाळकर यांनी शुभेच्छा देताना प्रा.सौ. आसरडोहकर यांनी मातृत्व बांधिलकीतुन केलेली सेवा महाविद्यालयासाठी भुषण असल्याचे सांगितले.तर अध्यक्षीय समारोप करताना
डॉ.सुरेंद्र आलुरकर म्हणाले की,भाशिप्र ही संस्था मुळातच सद्‌गुणांचा समुच्चय निर्माण करणारी आहे. हेच या संस्थेचं
समाजात वेगळंपण आहे.ज्ञानाची जबाबदारी पार पाडताना त्या शिवाय आपलं वेगळं अस्तित्व सामाजिक संवेदना ठेवुन जेव्हा आपण जगतो.तेव्हा त्याग प्रवृत्तीतून संस्थेचा विकास होतो.हाच महाविद्यालयाचा इतिहास असल्याचे त्यांनी सांगितले. जबाबदारीचं भान ठेवुन ऱ्हदयस्थ केलेलं काम ज्यामुळे इतर आदर्श घेतात.तशीच सेवा सौ.उमा आसरडोहकर यांनी संपुर्ण कारकिर्दीत केली असुन त्यांच्या कामाचा संस्थेला मोठा अभिमान असल्याचे ते म्हणाले.या कार्यक्रमाला
आसरडोहकर हे
सहकुटुंब सहपरिवार उपस्थित होते.एवढेच नाही.तर प्रा.अविनाश जोशी,डॉ.पी.आर. कुलकर्णी,प्रा.शशीकांत टेकाळे,प्रसाददादा चिक्षे,डॉ.नितीन धर्मराव, प्रा.सौ.पाठक मॅडम, प्रा.सौ.रूक्मिणीताई पवार यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक,कर्मचारी व समाजातील अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.आईच्या सेवागौरव समारंभास अमेरिकेला स्थायिक असलेली प्रा.सौ.आसरडोहकर यांची मुलं आणि सुना यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.प्रल्हाद तावरे यांनी केले.तर उपस्थितांचे आभार प्रदर्शन प्रा.कालिदास चिटणीस यांनी मानले व प्रा.शैलेष पुराणिक यांनी गायिलेल्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
===============
*नोट-बातमी सोबत फोटो.*
===============

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *