आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित्त घेण्यात आलेल्या स्पर्धांचे पारितोषिक वितरण

अंबाजोगाई

अंबाजोगाई (प्रतिनिधी) आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित्त बुधवार,दि.11 सप्टेंबर रोजी घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय निबंध, वक्तृत्व व चित्रकला स्पर्धेतल विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली.या स्पर्धा साक्षरता विषयक प्रसार व प्रचार हवा या उद्देशाने घेण्यात आल्या.स्पर्धेत अंबाजोगाई तालुक्यातील अनेक शाळा सहभागी झाल्या.

पुर्वी लिहिता वाचता येणे व अंकगणित करता येणे एवढ्या पुरतीच साक्षरता मर्यादीत होती.परंतु,आता कार्यात्मक साक्षरता (फंक्शनल लिटरसी) याला महत्व प्राप्त झाले आहे.यामध्ये अर्थ,जल, आरोग्य,विधी,संगणक आदी विषयक साक्षरतेचा व्यापक दृष्टीकोण आपेक्षीत आहे.त्या अनुषंगाने अंबाजोगाई तालुक्यात शालेय स्तरापासुन विद्यार्थ्यांना समर्थ व सक्षम करता यावे तसेच भारताला सक्षम करण्यासाठी तो विद्यार्थी कार्यात्मक दृष्ट्या साक्षर असला पाहिजे हा विचार रूजविण्यासाठी आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनाची औचित्य साधुन विविध स्पर्धांचे आयोजन ही करण्यात आले होते.तत्पुर्वी 8 सप्टेंबर रोजी अंबाजोगाई तालुक्यातील सर्व शाळेत गाव पातळीवर साक्षरता दिनानिमत्त विविध उपक्रम आयोजित करण्यात आले होते.त्याच बरोबर तालुका स्तरावर विविध स्पर्धा घेण्यात आल्या. बुधवार,दि.11 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता चित्रकला, वर्क्तृत्व व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेसाठी विविध शाळांमधून प्रत्येक गटातून तीन विद्यार्थी हे स्पर्धक म्हणुन सहभागी झाले. गुणवंतांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक व सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. स्पर्धेला उद्घाटक म्हणुन श्रीमती कुंदा व्यास (मुख्याध्यापक योगेश्‍वरी नुतन विद्यालय) तर प्रमुख अतिथी म्हणुन गटविकास अधिकारी डॉ.संदिप घोणशीकर तर कार्यक्रमाच्याय अध्यक्षस्थानी योेश्‍वरी शिक्षण संस्थेचे पदाधिकारी वाय.एच. राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी सहाय्यक प्रकल्प अधिकारी(निरंतर शिक्षण)चंदन कुलकर्णी, मुख्याध्यापिका वर्षा चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले.यावेळी वाय.एच.राठोड यांनी बोलताना,“साक्षरता दिनानिमित्त चंदन कुलकर्णी यांनी स्पर्धेसाठी निवडलेल्या विषयांतून विद्यार्थ्यांमधील कलागुणांचे आविष्कार पहावयास मिळाले.” त्यामुळे कुलकर्णी यांच्या समय सुचकतेचे राठोड यांनी कौतुक केले.यावेळी चित्रकला स्पर्धेतील विजेते ही पाचवी ते सातवी या गट-एकुण सहभागी स्पर्धक 10, अर्पणा वैजनाथ कराड, प्रमोदीजी महाजन न्यु इंग्लिश स्कुल (प्रथम), प्रथमेश अभय खोगरे, खोलेश्‍वर माध्यमिक विद्यालय (द्वितीय), चैतन्य चंद्रकांत चोपणे, प्रमोदजी महाजन न्यु इंग्लिश स्कुल (तृतीय) स्पर्धेसाठी ‘जलसाक्षरता’ हा विषय देण्यात आला होता. तसेच इयत्ता 8 वी ते 10 वी गटासाठी चित्रकला स्पर्धेकरीता ‘संगणक साक्षरता’ हा विषय देण्यात आला होता.या स्पर्धेत 12 स्पर्धक सहभागी झाले. विजेते ओमकेश बाळासाहेब आंधळे योगेश्‍वरी नुतन विद्यालय अंबाजोगाई (प्रथम),अनिकेत शिवाजी देशमुख, संभाजीराव बडगिरे माध्यमिक विद्यालय ममदापुर (द्वितीय), अनुश्री पांडुरंग दरगड, गोदावरील कुंकूलोळ योगेश्‍वरी कन्या शाळा (तृतीय) चित्रकला स्पर्धेसाठी व्ही.एम. पंडीत,दत्ता बनसोडे, गणेश कदम यांनी परिक्षक म्हणुन काम पाहिजे.तसेच वक्तृत्व स्पर्धा ही दोन गटात घेण्यात आली. पाचवी ते सातवी गटासाठी,‘मुलींचे शिक्षण प्रगतीचे लक्षण’ हा विषय होता यात 11 स्पर्धक सहभागी झाले. विजेते संयुक्ता दुर्गादास चौधरी,गोदावरील कुकूंलोळ योगेश्‍वरी कन्या शाळा (प्रथम), कु.जागृती जयदिप विर्धे,गोदावरील कुकूंलोळ योगेश्‍वरी कन्या शाळा आणि क्षीतीजा मकरंद पत्की, प्रमोदजी महाजन न्यु इंग्लिश स्कुल (द्वितीय विभागुन) प्रशांत राजेंद्र प्रसाद धायगुडे,योगेश्‍वी नुतन विद्यालय मंदिर विभाग (तृतीय) आणि आठवी ते दहावी गटासाठी,‘विधी साक्षरता काळाची गरज’ हा विषय देण्यात आला.या स्पर्धेतील विजेते श्रावणी शिवकुमार निर्मळे,गोदावरी कुकूंलोळ योगेश्‍वरी कन्या शाळा (प्रथम),आर्णव आनंद जोशी,प्रमोदजी महाजन न्यु इंग्लिश स्कुल (द्वितीय),आर्या बाळासाहेब केंद्रे,प्रमोदजी महाजन न्यु इंग्लिश स्कुल (तृतीय) हे विजेते ठरले.वक्तृत्व स्पर्धेसाठी सी.डी.कुलकर्णी व एस.एस.सुरवसे यांनी परिक्षक म्हणुन काम पाहिले.निबंध स्पर्धा दोन गटात घेण्यात आली.इयत्ता 5 वी ते 7 वी गटासाठी,‘शिकवा एक तरी’ हा विषय होता.या स्पर्धेत एकुण 13 स्पर्धक सहभागी झाले.यातील विजेते पंकजा सोमनाथ गित्ते, प्रमोदजी महाजन न्यु इंग्लिश स्कुल (प्रथम), तन्वी महादेव कापसे, प्रमोदजी महाजन न्यु इंग्लिश स्कुल (द्वितीय), प्रगती रामहरी फुंदे, गोदावरी कुंकूलोळ योगेश्‍वरी कन्या शाळा (तृतीय) हे विजेते ठरले. इयत्ता 8 वी ते 10 साठी ‘साक्षर भारत समर्थ भारत’ हा विषय होता. सदर स्पर्धेतील विजेते साक्षी सुभाष लिंगे, जयप्रभा माध्यमिक विद्यालय कुंबेफळ (प्रथम),तनुजा बालाजी महामुनी, गोदावरी कुंकूलोळ योगेश्‍वरी कन्या शाळा (द्वितीय), साक्षी भानुदास गावडे, गोदावरी कुंकूलोळ योगेश्‍वरी कन्या शाळा, (तृतीय) हे विजेते ठरले. निबंध स्पर्धेसाठी भागवत मसने,आर. आर.कुलकर्णी,एस.व्ही.घोडके यांनी काम पाहिले.आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धासाठी निरंतर शिक्षण विभागचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी चंदन कुलकर्णी यांनी पुढाकार घेतला.यावेळी गोदावरी कुंकूलोळ कन्या शाळेच्या क्रीडा शिक्षक श्रीमती मंगला लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेत विभागीय स्तरावर हॉकी स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला तसेच त्यांना जळगाव येथील संस्थेचा राज्यस्तरीय आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार जाहिर झाल्याबद्दल डॉ.संदीप घोणशीकर व वाय.एच.राठोड यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला.

“केवळ पाठ्यपुस्तकातील ज्ञान व परिक्षा हाच शिक्षणाचा गाभा नसुन कला,साहित्य,क्रीडा या गुणांचा विकास देखील खर्‍या शिक्षणाचा गाभा आहे.”-
डॉ.संदीप घोणशीकर (गटविकास अधिकारी,अंबाजोगाई)


“प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या परिसरातील एका अशिक्षीत अथवा एका निरक्षरास साक्षर करावयाचे ठरविले तर 100 टक्के साक्षरतेचे देशाचे स्वप्न सत्यात येण्यास वेळ लागणार नाही.त्यामुळे शिकवा एक तरी या उक्तीचे कृतीत रूपांतर करा”

-चंदन कुलकर्णी (सहाय्यक प्रकल्प अधिकारी,निरंतर शिक्षण)
===========================

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *