प्रमोदजी महाजन न्यू इंग्लिश स्कूलने तालुकास्तरीय स्पर्धेत पटकाविली 7 बक्षिसे

अंबाजोगाई

प्रमोदजी महाजन न्यू इंग्लिश स्कूलने तालुकास्तरीय स्पर्धेत पटकाविली 7 बक्षिसे-

अंबाजोगाई: दि. 13- जिल्हा परिषद शिक्षण विभाग बीड यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित्त गटशिक्षणाधिकारी अंबाजोगाई कार्यालयाकडून तालुकास्तरीय निबंध, वक्तृत्व व चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत शाळेने 7 बक्षिसे पटकाविली.

निबंध स्पर्धेत गट 5 ते 7 शाळेतील कु. पंकजा गित्ते- प्रथम कु.तन्वी कापसे – द्वितीय, वक्तृत्व स्पर्धा – कु. क्षितिजा मकरंद पत्की -द्वितीय, चित्रकला स्पर्धा- कु.अपर्णा कराड- प्रथम, चि. चैतन्य चोपणे – तृतीय, गट 8 ते 10 वक्तृत्व स्पर्धा – चि. अर्णव जोशी – द्वितीय तर कु. आर्या केंद्रे – तृतीय.

या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉ. संदीप घोणशीकर – गटविकास अधिकारी अंबाजोगाई व संयोजक श्री. चंदन कुलकर्णी – सहाय्यक प्रकल्प अधिकारी निरंतर शिक्षण हे होते.

या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा- सौ. मंगला कुलकर्णी, कार्यकारी अध्यक्ष- कमलाकर कोपले, संस्थापक सचिव – शैलेश कुलकर्णी, मार्गदर्शक- आनंद जोशी व प्राचार्या सौ. गीतांजली कुलकर्णी यांनी खूप खूप कौतूक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *