मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या मोर्चाने अंबाजोगाई दणाणली

अंबाजोगाई

भूमिहीन शेतमजुर व बेघरांचा पावसात निघाला मोर्चा
===========================
अंबाजोगाई (प्रतिनिधी) भूमिहीन शेतमजुर व बेघर लोकांच्या विविध मागण्यांच्या संदर्भात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्या आला. मोर्चाचे नेतृत्व कॉ. बब्रुवाहन पोटभरे यांनी केले.यावेळी तहसीलदार यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. पावसात निघालेल्या या मोर्चात भूमीहीन शेतमजुर व बेघर स्त्री-पुरूष शेकडोंच्या संख्येने सहभागी झाले.

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने अंबाजोगाईच्या तहसिलदारांना देण्यात आलेल्या निवेदनात शेतमजुरांना दुष्काळी श्रमभत्ता म्हणुन प्रति रेशनकार्ड रूपये 20 हजार रूपये अनुदान द्या,बेघर लोकांना सर्वे नंबर -17 मध्ये घरे द्या, पंचशील नगरचे घाटनांदुरला जोडलेले स्वतधान्य दुकान,सदर बाजार येथील श्री.भुसारे यांचे स्वतधान्य दुकान या बाबत कार्यवाही करणे तसेच तालुक्यातील मौजे ममदापुर येथील दलित वस्ती व गावच्या स्मशानभूमीचा प्रश्‍न तात्काळ निकाली काढून जमीनीची मोजणी करा,गावात धार्मिक व जातीय तणाव होणार नाही याची काळजी घ्या, या स्थानिक मागण्यांसह जम्मू काश्मिरवर लादलेली राष्ट्रपती राजवट तात्काळ हटवा आदी मागण्यांबाबत मोर्चा काढून आंदोलन करण्यात आल्याची माहिती कॉ.बब्रुवाहन पोटभरे यांनी दिली.अंबाजोगाईतील पोलीस स्टेशन समोरून भर पावसात निघालेला मोर्चा शिवाजी चौक, सावरकर चौक मार्गे तहसील कार्यालयावर धडकला,मोर्चात सहभागी होवून व निवेदनावर कॉ.बब्रुवाहन पोटभरे,धम्मानंद पिसाळ,दिलीप सरवदे,छाया तरकसे,मिरा पाचपिंडे,कल्पना सरवदे,सारिका सरवदे,अनिल ओव्हाळ, पुनमसिंग टाक,दिपक गायकवाड,हिंमत सिंग, दिनकर सरवदे आदी प्रमुख कार्यकर्त्यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.सदर मोर्चात भूमीहीन शेतमजुर व बेघर स्त्री-पुरूष शेकडोच्या संख्येने सहभागी झाले होते.

============================

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *