*विरोधीपक्षनेते ना.धनंजयजी मुंंडे व रोहितदादा पवार विजयी व्हावेत यासाठी अंबाजोगाईतील युवकांचे श्री योगेश्‍वरी देवीला साकडे*

अंबाजोगाई
राज्याचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुलूखमैदान तोफ अशी ओळख असलेले ना.धनंजयजी मुंडे व अभ्यासू आणि सृजनशील नेतृत्व म्हणुन ओळख असलेले रोहितदादा पवार हे दोन्ही नेते अनुक्रमे परळी आणि कर्जत-जामखेड विधानसभा
मतदार संघातून मोठ्या मताधिक्याने निवडून यावेत यासाठी अंबाजोगाईत श्री योगेश्‍वरी देवीला साकडे घालण्यात आले आहे.
शहरातील आशिष देशमुख,अविनाश जगताप,सोमेश्‍वर चौधरी,वैभव गंगणे, अमित पवार,साजीत मनियार,कुलदिप देशमुख,बलराम कदम या युवकांनी माता योगेश्‍वरी देवीस 11 नारळाचे तोरण बांधुन राज्याचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुलूख मैदान तोफ अशी ओळख असलेले ना.धनंजयजी मुंडे व अभ्यासू आणि सृजनशील नेतृत्व म्हणुन ओळख असलेले रोहितदादा पवार हे दोन्ही नेते अनुक्रमे परळी आणि कर्जत-जामखेड विधानसभा मतदार संघातून मोठ्या मताधिक्याने निवडून यावेत यासाठी असे साकडे घातले आहे व निवडून आल्यास श्री योगेश्‍वरी देवीस 1100 नारळांचा तोरण विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे व रोहित दादा पवार यांच्या हस्ते बांधण्याचा संकल्प सदरील युवकांनी केला आहे….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *