मानवलोक समाजकार्य महाविद्यालय क्षेत्रकार्य अंतर्गत पाणी स्रोत, स्वच्छता या प्रश्नावर बैठक संपन्न.

अंबाजोगाई

मानवलोक समाजकार्य महाविद्यालयाच्या वतीने गांधीनगर, मिलिंदनगर, गवळीपुरा या भागामध्ये क्षेञकार्याअतर्गंत पाणी स्रोत, स्वच्छता, व परिसरातील विविध समस्या या संदर्भात नगरपालिकेसह बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये माजी उपनगराध्यक्ष राजकिशोर मोदी, नगरसेवक इस्माईल गवळी, धम्मपाल सरवदे, संजय गंभिरे, सुनिल व्यवहारे, प्रताप देवकर, प्रा. सुकेशिनी जोगदंड उपस्थित होते.

या बैठकीमध्ये मानवलोक समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दोन महिने अभ्यासपूर्ण पाणी स्रोत, स्वच्छता, व परिसरातील विविध प्रश्नांची मांडणी PPT सादरीकरण करुन दाखवण्यात आली. यानंतर सदरित परिसरातील नागरिकांनी नगरपालिका प्रतिनिधींना गल्लीतील समस्या मांडून सोडवण्याची मागणी केली. यावेळी सदरीत प्रश्न सोडवले जातील नागरिकांनी पाणी जपून वापरावे असे राजकिशोर मोदी यांनी आवाहन केले. यावेळी बैठकीचे उद्घाटन स्वागत गित गाऊन करण्यात आले. तर बैठकीचे सुंञसचालन नागिनी गलबे यांनी केले, तर ppt सादरीकरण शोभा किरवले, सावित्रा इरमले तर प्रस्ताविक मजहर सय्यद यांनी केले. बैठकीचे आभार कृष्णा सापते या़नी मानले. या बैठकीमध्ये क्षेत्रकार्य मार्गदर्शिका प्रा. सुकेशिनी जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णा सापते, शोभा किरवले, नागिन गलबे, सवित्रा ईरमले, सतीश वाघमारे, मज़हर सय्यद , गणेश, प्रदीप, दीपक ऋचा,चंद्रदीप आणि सूरज यांनी परिश्रम घेतले. यावेळी सदरीत बैठकीला परिसरातील महिला ,पुरूष व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *