स्व.नाना पालकर आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेस उस्फुर्त प्रतिसाद

अंबाजोगाई

माणूस केंद्रस्थानी ठेवून ‘संघ’ कार्य करतो-दाजी जाधव
===========================
अंबाजोगाई (प्रतिनिधी) शहरात गेली 49 वर्षे सातत्याने स्व.नाना पालकर आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात येते.यावर्षीही या स्पर्धेला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. पारितोषिक वितरण समारंभात बोलताना राष्ट्रिय स्वयंसेवक संघाचे देवगिरी प्रांत संघचालक दाजी जाधव यांनी माणूस हा केंद्रस्थानी ठेवूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सातत्याने काम करतो असे सांगितले.स्व. नानांनी आपले जीवन हे समाजात राष्ट्रप्रेम, देशभक्ती रूजविण्यासाठी झिजवले.संघाची वाटचाल ही तब्बल 93 वर्षांची असून एका विश्वासावर हे संघटन टिकून असल्याचे प्रतिपादन जाधव यांनी केले.स्पर्धेतील सर्वच विद्यार्थ्यांनी आपल्या विषयाला न्याय दिल्याचे त्यांनी सांगितले.विजेत्यांचे अभिनंदन केले.

गुरूवार,दि.26 सप्टेंबर रोजी खोलेश्वर महाविद्यालयात स्व.नाना पालकर आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.स्पर्धेचे हे 49 वे वर्ष होते.या स्पर्धेत एकूण 16 संघ 50 विद्यार्थी हे मराठवाड्यातील औरंगाबाद,नांदेड,लातूर, जिंतूर,बीड,माजलगाव परळी,सिरसाळा, वडवणी,घाटनांदुर आदी ठिकाणांहून सहभागी झाले होते.स्पर्धेचे उदघाटन भाशिप्र संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुरेंद्र आलूरकर यांच्या हस्ते तर संस्थेच्या केंद्रीय कार्यकारिणी सदस्या डॉ.कल्पनाताई चौसाळकर,केंद्रीय कार्यकारिणी सदस्य अप्पाराव यादव,उपनगराध्यक्षा सौ.सविताताई लोमटे,स्थानिक व्यवस्था मंडळाचे कार्यवाह बिपीनदादा क्षीरसागर, प्राचार्य डॉ.कमलाकर कांबळे,शहरसंघचालक दत्तप्रसाद रांदड,स्पर्धा प्रमुख डॉ.दिगंबर मुडेगावकर,परीक्षक प्रा.अरुण चव्हाण, मुख्याध्यापक उन्मेश मातेकर,शिक्षिका मंजुषा महाजन यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी बोलताना डॉ.सुरेंद्र आलूरकर यांनी, स्वतःला व्यक्त करण्यासाठी वक्तृत्वासारखे दुसरे साधन नाही.त्यामुळे श्रोत्यांना पोहोचेल व पचेल असे आपले वक्तव्य असले पाहिजे, आपण काय बोलतो व कसे बोलतो याचे आपणास भान असले पाहिजे,आपला स्वतःचा अनुभव जर वक्तव्यात मिसळला तर तो प्रभावी होतो.यातून स्वानुभूतीचे दर्शन घडते.आपल्या बोलण्यातून आपले अस्तित्व सिद्ध करता आले पाहिजे,नेतृत्व गुण विकसित होतो.स्व.नाना पालकर हे एक उत्तम वक्ते होते असे डॉ. आलूरकर यांनी सांगितले.तर प्रास्ताविक करताना प्राचार्य डॉ.कमलाकर कांबळे यांनी पुढील वर्ष हे स्पर्धेचे सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. त्यामुळे किमान 51 संघ स्पर्धेत सहभागी होतील यासाठी आपण प्रयत्न करू अशी माहिती दिली.यावेळी उपनगराध्यक्ष सौ. सविताताई लोमटे यांनी भाशिप्र संस्था ही मानवी मुल्ये रुजवणारी संस्था असल्याचे सांगितले.प्रा.शैलेष पुराणिक यांनी पद्य सादर केले.तर उदघाटन सत्राचे सूत्रसंचालन प्रा.प्रल्हाद तावरे यांनी करून उपस्थितांचे आभार स्पर्धा सहप्रमुख प्रा.शाम बारडकर यांनी मानले.
समारोप समारंभाला व्यासपीठावर राष्ट्रिय स्वयंसेवक संघाचे देवगिरी प्रांत संघचालक
दाजी जाधव,केंद्रीय कार्यकारणी सदस्य अप्पाराव यादव, स्थानिक व्यवस्था मंडळाचे कार्यवाह बिपीनदादा क्षीरसागर,महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष राम कुलकर्णी,प्राचार्य डॉ.कमलाकर कांबळे यांची उपस्थिती होती. यावेळी स्पर्धा प्रमुख प्रा.डॉ.दिगंबर मुडेगांवकर यांनी स्पर्धेचा आढावा घेताना सन 1970 पासून स्पर्धा सलग सुरू असल्याचे सांगितले. स्पर्धेसाठी पुण्याहून आलेल्या विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले.यावेळी परीक्षक प्रा.अरुण चव्हाण,स्पर्धक कु.मुंडे व चि.जगताप यांनी आपले मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय समारोप करताना बिपिनदादा क्षीरसागर म्हणाले की,ही वादविवाद स्पर्धा नव्हे तर वक्तृत्व स्पर्धा असल्याचे सांगून अखिल भारतीय गुण समुच्ययाचा उपयोग हा समाजासाठी व्हावा असे स्व.नानांचे व्यक्तिमत्त्व होते. स्पर्धेच्या निमित्ताने नव्या पिढीचे वाचन व चिंतन झाले पाहिजे हाच विधायक हेतू असल्याचे बिपीनदादा क्षीरसागर म्हणाले.यावेळी सौ.शरयुताई हेबाळकर,अ.द.पत्की अविनाश जोशी,सु.ह. देशपांडे,डॉ.नितीन धर्मराव, अविनाशराव हसनाळकर,नरहरी पोलावर हे मान्यवर उपस्थित होते. निकालाचे वाचन प्रा. विनय राजगुरू यांनी केले.समारोप समारंभाचे सूत्रसंचालन प्रा.कालिदास चिटणीस यांनी करून उपस्थितांचे आभार स्पर्धा सहप्रमुख प्रा.शाम बारडकर यांनी मानले.कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली.

स्पर्धेतील विजेते पुढीलप्रमाणे-
===========================
कु.अमृता सतीश धानोरकर-प्रथम (खोलेश्वर महाविद्यालय,अंबाजोगाई),हे पारीतोषिक आदर्श शिक्षक स्व.ज्योतिबा रामभाऊ नारायणकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ देण्यात आले.प्रशांत सुधाकर शिंगाडे-द्वितीय (राजीव गांधी संगणक व पत्रकारिता महाविद्यालय, सोनपेठ) हे पारितोषिक सौ.लताताई अशोकराव पत्की यांच्या वतीने देण्यात आले.कु.श्रुती श्रीधर पाटील-तृतीय (देवगिरी वरिष्ठ महाविद्यालय औरंगाबाद),हे पारीतोषिक भाशिप्र संस्थेचे संस्थापक कै.राजाभाऊ चौसाळकर यांचे स्मरणार्थ डॉ.गोपाळराव चौसाळकर यांनी दिले.सर्व विजेत्यांच्या
पारितोषिकांचे स्वरुप हे रोख रक्कम, सन्मानचिन्ह,उठावणी गीतसंग्रह असे होते.तर
बालाजी शेरकर यांचे तर्फे विजेत्यांना अनुक्रमे
सुभाषचंद्र बोस,सरदार वल्लभभाई पटेल,
भगिनी निवेदिता यांचे चरित्रग्रंथ भेट म्हणून देण्यात आले.फिरता सांघिक चषक विजेता संघ-कु.श्रुती श्रीधर पाटील,कु.गौरी संजय गिरी (देवगिरी महाविद्यालय, औरंगाबाद) यांनी पटकावला.
===========================

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *