अंबाजोगाईत 20 ऑक्टोबर रोजी विभागीय महिला मेळाव्याचे आयोजन

अंबाजोगाई

अंबाजोगाई (प्रतिनिधी) अंबाजोगाईत ज्येष्ठ महीला नागरिक संघाच्या वतीने रविवार,दि.20 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत अनिकेत मंगल कार्यालय,अंबाजोगाई (जि.बीड) येथे विभागीय महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती ज्येष्ठ महिला नागरिक संघाच्या अध्यक्षा कमलताई बरूळे यांनी दिली आहे.

ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने अंबाजोगाईत बीड,उस्मानाबाद, लातूर,परभणी (दक्षिण मराठवाडा) या जिल्ह्यांचा विभागीय महिला मेळावा आयोजित केला आहे.या मेळाव्यात सुमारे 500 महिला सहभागी होणार आहेत.मेळाव्यात “महिला सबलीकरण व कौटुंबिक हिंसाचार निर्मूलन” या विषयावर सखोल मार्गदर्शन होणार आहे.मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी डॉ.मायाताई कुलकर्णी (लातूर) या तर यावेळी प्रमुख वक्त्या म्हणून अॅड.अपर्णाताई रामतीर्थकर उपस्थित राहणार आहेत.महिला मेळाव्यात सासू-सुनांमध्ये सुसंवाद व्हावा हा विधायक हेतू आहे.मेळाव्यात ज्येष्ठ महिला सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण करतील.तरी या विभागीय महिला मेळाव्यास बीड,उस्मानाबाद,लातूर, परभणी या जिल्ह्यातील महिलांनी सहभागी व्हावे असे आवाहन कमलताई बरूळे यांनी केले आहे.

▪▪▪
=======================================

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *