म.गांधी जयंतीनिमित्त यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात महास्वच्छता अभियान

अंबाजोगाई

अंबाजोगाई (प्रतिनिधी) मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 150 वी जयंतीनिमित्त महास्वच्छता अभियान,प्लॅस्टीक मुक्ती अभियान, तंबाखू मुक्तीविषयी शपथ,एकता दौड असे अनेक उपक्रम राबविण्यात आले.

सर्वप्रथम महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.वनमाला गुंडरे, उपप्राचार्य पी.के.जाधव,डॉ.मुकुंद राजपंखे,राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमधिकारी डॉ.इंद्रजीत भगत व डॉ.अनंत मरकाळे यांनी महात्मा गांधी,दिवंगत पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन केले.त्यानंतर राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक सुरज देशमख,पुजा सापते यांनी महात्मा गांधीच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला.त्यांनतर उपप्राचार्य पी.के जाधव यांनी महात्मा गांधी यांच्या अहिंसा व सत्याग्रह याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. शेवटी कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्या डॉ.वनमाला गुंडरे म्हणाल्या की,महात्मा गांधीजी यांनी स्वच्छतेचे महत्व सांगितले.ते स्वच्छतेचे तत्व आपण आत्मसात केले पाहिजे. आपले घर व आपल्या कार्यालयाचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी आपण प्रयत्नशील असले पाहिजे.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ.अनंत मरकाळे यांनी केले.तर उपस्थितांचे आभार डॉ.इंद्रजीत भगत यांनी मानले.या कार्यक्रमाला प्रा.केशव हंडीबाग,डॉ.मुकुंद राजपंखे,डॉ.रमेश शिंदे,प्रा.प्रशांत जगताप, डॉ.वसंत गायकवाड, प्रा.चाऊस,प्रा.सुजाता पाटील,प्रा.हिरा नाडे,प्रा.देशमुख मॅडम व कार्यालयीन अधिक्षक लक्ष्मण वाघमारे उपस्थित होते.यानंतर सर्व प्राध्यापक व स्वयंसेवकांनी तंबाखू मुक्तीविषयी शपथ घेतली.तसेच प्लॅस्टीक मुक्ती अभियानाची सुरवात करण्यासाठी प्लॅस्टीक न वापरण्याचा निर्धार केला.महाविद्यालयातील प्लॅस्टीक कचरा घोळा केला.राष्ट्रीय सेवा योजनाच्या स्वयंसेवकांनी महाविद्यालयाचा संपूर्ण परिसर स्वच्छ केला.शेवटी महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त एकता दौडचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये प्राध्यापक व स्वंयसेवकांनी उस्फूर्त सहभाग घेतला.

▪▪▪

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *