सिंदखेडराजा येथील जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हा -प्रविण ठोंबरे

अंबाजोगाई
12 जानेवारी रोजी सिंदखेड राजा येथे दरवर्षी प्रमाणे यावर्षी मराठा सेवा संघाच्या वतीने 422 व्या जिजाऊ जन्मोत्सवाचे सोहळ्याचे आयोजन जिजाऊ सृष्टी मातृतीर्थ सिंदखेड राजा येथे करण्यात आले आहे.तरी आपण आपल्या कुटुंबासहीत या सोहळ्यात सहभागी होवून  सोहळ्याचे साक्षीदार व्हावे असे आवाहन संभाजी ब्रिगेडचे बीड जिल्हाकार्याध्यक्ष प्रविण ठोंबरे यांनी केले आहे. संभाजी ब्रिगेडचे बीड जिल्हाकार्याध्यक्ष प्रविण ठोंबरे यांनी केलेल्या अवाहनानुसार रविवार, दि.12 जानेवारी रोजी मराठा सेवा संघाच्या वतीने सावित्री-जिजाऊ-संत चोखामेळा महाराज जन्मोत्सव व समाज प्रबोधन समारोह सिंदखेड राजा (जि.बुलढाणा) येथे आयोजित करण्यात आला आहे.यावेळी या सोहळ्यात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून खा.छत्रपती संभाजी राजे भोसले,युवराज्ञी संयोगीता संभाजीराजे भोसले, ना.डॉ.राजेंद्र शिंगणे, खा.प्रतापराव जाधव,मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार,प्रदेशाध्यक्ष विजय घोगरे,महासचिव मधुकर मेहकरे,संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोजदादा आखरे हे प्रमुख पाहुणे म्हणून तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अ‍ॅड.पुरूषोत्तमजी खेडेकर यांच्यासह असंख्य मान्यवर, कार्यकर्ते विविध क्षेत्रात कार्यरत सेवा संघाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.तरी बीड जिल्ह्यातील प्रवर्तनवादी चळवळीत काम करणार्‍या बांधवांनी आपल्या कुटुंबासहीत या सोहळ्यात सहभागी होवून सोहळ्याचे साक्षीदार व्हावे असे आवाहन संभाजी ब्रिगेडचे बीड जिल्हाकार्याध्यक्ष प्रविण ठोंबरे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *