नगरपरिषद कडुन काढण्यात आलेले बोगस डिजीटल होर्डींग टेंडर त्वरीत रद्द करा व लोकजनशक्ती पार्टीच्यावतीने चालु असलेल्या अमर उपोषणास युवासेनेचा जाहिर पाठिंबा- अक्षय भुमकर

अंबाजोगाई
अंबाजोगाई नगर पलिकेच्या स्थायी समितीकडून डिजिटल होडिंग ई-टेन्डर निविदा काढून चुकीच्या पध्दतीने राबवून बोगस टेन्डर दिले आहे. सदरील बोगस टेन्डर पूर्णपणे रद्द करण्यात यावे व यासाठी           दि.06/01/2020 पासून लोकजनशक्ती पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते अमरण उपोषणास बसले आहेत. त्यांच्या हया लोकशाही पध्दतीने चालू असलेल्या आंदोलनास आमच्या युवासेनेच्या वतीने पूर्ण पाठिंबा आहे. उपोषण करत्याची प्रकृती दिवसेंन दिवस खालावत चालली असताना सुध्दा त्यांच्या कडे मुख्याधिकारी हे एक वेळेस हि फिरकले नसुन त्यांनी हा विषय गांभिर्याने अजुनही घेतला नाही म्हणुन आम्ही युवासेना अंबाजोगाई तालुक्याच्या वतीने या मागणिच्या सदरील विषयीच्या उपोषणास पाठींबा देत असुन नगरपरिषदेने हे बोगस डिजीटल होर्डींग टेंडर तात्काळ रद्द करण्यात यावे अशी मागणी युवासेनेच्या वतीने , युवासेना विधानसभा चिटणीस अक्षय भुमकर यांनी व त्यांच्या सहकारी पदाधिकार्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
तरी या बाबत वेळीच योग्य ती कार्यवाही न केल्यास आमच्यावतीने सुध्दा तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल याची होणाऱ्या संपूर्ण परिणामाची जबाबादारी आपल्या कार्यालय प्रशासनाची राहिल असा इशारा ही युवासेनेच्या वतीने देण्यात आला आहे. यावेळी युवासेना विधानसभा चिटणीस अक्षय भुमकर, विद्यार्थी सेना तालुका प्रमुख अभिमन्यु वैष्णव, युवासेना माजी तालुका प्रमुख विष्णु धायगुडे, उपशहरप्रमुख आकाश सुरवसे, अमोल वैष्णव, अमित परदेशी,रोहित वैष्णव आदी उपस्थित होते..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *