अंबाजोगाईत शुक्रवारी ललित कला अकादमीचे उदघाटन व धृपद गायन

अंबाजोगाई

अंबाजोगाईत शुक्रवारी ललित कला अकादमीचे उदघाटन व धृपद गायन

अंबाजोगाई – पदमश्री शंकरबापू आपेगावकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ पदमश्री वासीफोद्दीन डागर यांचे धृपद गायन ‘धृपदसंध्या’ अंतर्गत होणार असून याच कार्यक्रमात संगीत व ललित कला क्षेत्रात भरीव काम करण्यासाठी नव्याने ललित कला अकादमी अंबाजोगाई ही संस्था उभी राहते आहे त्याचे उदघाटन पं. नाथराव नेरळकर यांच्या हस्ते होणार आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, ललित कला अकादमी ही संस्था नव्याने उभा झाली आहे. संगीत, गायन व वादन, नृत्य, (कथ्थक, भरत नाट्यम, ओडिसी, व इतर) शिल्प, चित्र, लोककला आदी ललित कला जोपासण्यासाठी ही अकादमी कार्य सुरू करीत आहे. शहरातील संगीत क्षेत्रातील कै. पदमश्री शंकर बापू आपेगावकर, भगवानराव लोमटे, शंकर पांडे, राम मुकदम, शैला लोहिया व माणिक संघई या गायक, वादक व रसिक यांच्या स्मृती कायम राहाव्यात म्हणून त्यांच्या नावाने वेगवेगळ्या महिन्यात संगीताचे कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत.
दर दोन माहिन्यानी हे कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. त्यातील पाहिले पुष्प हे पद्मश्री शंकरबापू आपेगावकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ पदमश्री वासीफोद्दीन डागर यांच्या धृपद गायनाने सुरू होईल. त्यांना पखवाजवर पं. उद्धवराव आपेगवकर हे साथ करणार आहेत.

*ललित कला अकादमीचे उदघाटन*
धृपद गायनापूर्वी ललित कला अकादमी अंबाजोगाईचे उदघाटन मराठवाड्यातील ज्येष्ठ गायक पं. नाथराव नेरळकर यांच्या हस्ते होईल. अध्यक्षस्थानी ह. भ. प. प्रकाश महाराज बोधले हे राहतील तर प्रमुख उपस्तिथी ज्येष्ठ रसिक व योगेश्वरी देवल कमिटीचे अध्यक्ष भगवानराव शिंदे हे व डॉ. नंदकुमार सोमवंशी हे असतील.

शुक्रवार, दिनांक ३१जानेवारी २०२० रोजी सायंकाळी ७ वाजता ईट अँड स्टे हॉटेल सभागृह, बडोदा बॅंकेच्यावर, मोंढा रोड, अंबाजोगाई येथे संपन्न होईल अशी माहिती ललित कला अकादमी अंबाजोगाईचे अध्यक्ष दगडू लोमटे यांनी दिली आहे.
या कार्यक्रमास सर्व रसिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन ललित कला अकादमी अंबाजोगाईचे सचिव उल्हास पांडे व पद्मश्री शंकरबापू आपेगावकर ट्रस्ट चे कमलाकर पाटील यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *