स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयात “स्थुलता आणि बधिरीकरण” या विषयावरील कार्यशाळा संपन्न

अंबाजोगाई

स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयात “स्थुलता आणि बधिरीकरण” या विषयावरील कार्यशाळा संपन्न
————————————–
अंबाजोगाई (प्रतिनिधी)–
येथील स्वा.रा.ती.ग्रा.वै. महाविद्यालयाच्या बधिरीकरणशास्त्र विभागातर्फे “स्थुलता आणि बधिरीकरण” या विषयावरील एकदिवसीय कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली.
या कार्यशाळेत येथील या विषयातील तज्ज्ञ डॉ.बंडे, डॉ. मुथ्था व डॉ. वाळिंबे यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख होते. तर या कार्यशाळेचे ऑरगनायझिंग सेक्रेटरी डॉ. शैलेंद्र चौहान होते .
या कार्यशाळेत मार्गदर्शन करतांना अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी स्थुलता ही सद्यस्थित गंभीर समस्या झाली असून अशा रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी भुल देताना विशेष काळजी घेतली जाते. या मध्ये विकसीत झालेल्या नवीन तंत्रज्ञानाची माहिती या महाविद्यालय व रुग्णालयातील संबंधित विभागातील प्राध्यापक व पदव्युत्तर विद्यार्थ्यांना व्हावी म्हणून या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. या विषयातील तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन सर्व डॉक्टर्स आणि पद्वव्युत्तर विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरेल असे मत ही अधिष्ठाता डॉ. देशमुख यांनी आपल्या व्यक्त केले.
आपल्या प्रास्ताविकात बधिरीकरणशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ.शैलेंद्र चव्हाण यांनी येणाऱ्या काळात या विषयातील ज्ञान कसे उपयोगी पडेल याचे विश्लेषण केले. व कार्यशाळेत सहभागी झालेल्या सर्व प्राध्यापक आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांचे आभार मानले.
या कार्यक्रमासाठी स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाचे
उपअधिष्ठाता डॉ. धपाटे व डॉ. राजेश कचरे, रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. राकेश जाधव उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी सर्व विभागांचे विभागप्रमुख डॉ. प्रशांत देशपांडे, डॉ. सिध्देश्वर बिराजदार, डॉ. मोगरेकर, डॉ. दिपक लामतुरे डॉ. नितीन चाटे, डॉ. तोंडगे, डॉ हंडरगुळे मॅडम, डॉ. काळे, मेट्रन भताने व बधिरीकरण विभागाचे सर्व डॉक्टर्स, पदव्यूत्तर विद्यार्थी, नर्सिंग स्टाफ आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बधिरीकरण शास्त्र विभागाच्या सहयोगी प्राध्यापिका डॉ.अपर्णा कुलकर्णी यांनी केले तथ आभार डॉ. मेघना यांनी मानले. या कार्यशाळेत ३०० डाँक्टर व पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *