अखिल भारतीय गांधर्व तबला वादन परीक्षेत अक्षय त्रिमुखे व रितेश उडानशिव यांचे यश

अंबाजोगाई

सुरताल संगीत विद्यालय व महाविद्यालय मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या नोव्हेंबर 2018 या सत्रात संगीताच्या तबला वादन या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून यात सुरताल संगीत विद्यालयाने 100%यश संपादन केले आहे. या परिक्षेत विद्यालयाचे अक्षय त्रिमुखे व रितेश उडानशिव या विद्यार्थ्यांनी सर्व प्रथम येण्याचा बहुमान मिळविला आहे.तसेच वैभव जाधव व वैभव पाठक हे विद्यार्थ्यां देखील यशस्वी झाले आहेत .या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे सुरताल संगीत विद्यालयाचे सत्यवान शिंदे ,बाबुराव बाभूळगावकर यांनी अभिनंदन करून त्यांचा सत्कार केला आहे. तसेच संगीत तथा कला क्षेत्रातील विविध मान्यवरांकडून तसेच अंबाजोगाई शहरातील विविध राजकीय तथा सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींकडून देखील गुणवन्त विद्यार्थी व त्यांच्या शिक्षकांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *