प्रा. प्रसाद कुलकर्णी यांच्या youtube वरील गाण्याने रसिक मंत्रमुग्ध

अंबाजोगाई

भारत माझा देश आहे “एक आगळेवेगळे देशभक्तीपर गीत

आपल्या शालेय जीवनातील परिपाठात नित्याने म्हटली जाणारी गद्य प्रतिज्ञा “भारत माझा देश आहे ” पद्यरूपात कधी ऐकली आहे का ….? नाही ना…!!!  पण याच प्रतिज्ञेला संगीतातील स्वरांमध्ये आणि ताला मध्ये बांधल्यास ते एक उत्तम सुश्राव्य गीत होऊ शकते अशी कल्पना प्रा.प्रसाद कुलकर्णी यांना सुचली आणि ही गद्य रूपात असलेली प्रतिज्ञा पद्यरूपात ऐकायला आता ती युट्युब वर उपलब्ध आहे.मराठी भाषेतील प्रत्येक अक्षर छंदातून जन्माला येते. त्यांचा संवाद कळाला की सांगीतिक रचना तयार व्हायला मदत होते.अशी प्रचिती हे गीत ऐकताना येते.
        प्रा. प्रसाद कुलकर्णी हे जवळबन (ता.केज जि.बीड) येथील रहिवासी पण संगीताचे अध्ययन आणि अध्यापन करण्यासाठी ते अंबाजोगाई ला राहतात. मराठवाड्यातील ख्यातनाम संगीततज्ञ पं.शिवदासजी देगलुरकर यांच्या बालगंधर्व संगीत महाविद्यालयात ते संगीताचे अध्ययन करतात तर त्यांच्या स्वत:च्या शिवरंग संगीत विद्यालय येथे अध्यापन करतात.पैठण (सा.) (ता.केज)येथील वसुंधरा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात ते संगीत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.आजवर अनेक अभंग, गौळणी,भक्तीगीत, भावगीत,गजल, लोकगीत त्यांनी संगीतबद्ध केलेले आहेत.यूट्यूब च्या माध्यमातून समाजातील लहान थोरांना सांगितीकआनंद देण्याचा त्यांचा यापुढेही प्रयत्न असणार आहे.
        सदरील गीत हे 26 जानेवारी 2019 भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने समस्त भारतवासीयांच्या चरणी त्यांनी युट्युब वर समर्पित केले आहे. PRASAD KULKARNI या नावाने शोध घेतल्यास युट्युब वर त्यांचे चँनल सापडते.
        या गीताचे संगीत संयोजन चि.श्रीराम खोगरे, तबला चि. संकेत जोशी , रेकॉर्डिंग चि.अनुज रोकडे तर व्हिडिओग्रफी चि. मोहित वळसंगीकर यांनी केली आहे .
        कोणाच्याही मनाला सहज स्पर्श करणारी चाल, उत्तम आवाज आणि दर्जेदार देशभक्तीपर गीत म्हणुन युट्युब वर हे गीत वायरल होताना दिसते व प्रसिद्धीच्या झोतात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *