शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेता अक्षय राऊत यांचा सत्कार

अंबाजोगाई

राष्ट्रीय पातळीवर चार वेळा चमकदार कामगिरी करणाऱ्या अक्षय राऊत यास राज्य शासनाचाशिवछत्रपती क्रीडा पुरस्कार मिळाला . माजी विद्यार्थी व राष्ट्रीय खेळाडू अक्षय राऊत आणि त्याच्या आई – वडिलांचा सत्कार गुरुवारी योगेश्वरी नूतन विद्यालयात करण्यात आला .
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ . सुरेश खुरसाळे होते . यावेळी व्यासपीठावर संस्थेचे सचिव गणपत व्यास , कोषाध्यक्ष प्रा . माणिकराव लोमटे , मुख्याध्यापिका सौ .के.टी. व्यास , उपमुख्याध्यापिका अलका साळुंके ,डॉ . प्रभाकर राऊत व त्यांच्या पत्नी उपस्थितीत होत्या .
संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुरेश खुरसाळे यांनी अक्षय राऊत यांना शाल व पुष्पहार देऊन सत्कार केला . तसेच शाळेतील सहशिक्षिका वंदना बालटकर यांनी पीएच.डी. पदवी प्राप्त केल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला .
सत्काराला उत्तर देताना अक्षय राऊत म्हणाले, लहानपणा पासून खेळाविषयी आवड होती . जिद्द आणि परिश्रम केल्यामुळे आपण सात वेळा राज्यस्तरावर आणि चार वेळा राष्ट्रीय पातळीवर पारितोषिके मिळविली . याच शाळेत शिकलो आणि येथेच माझा सत्कार झाल्याबद्दल मनस्वी आनंद होत आहे .
यावेळी डॉ .प्रभाकरराव राऊत, डॉ .वंदना बालटकर , डॉ . सुरेश खुरसाळे यांचीही भाषणे झाली . सुरुवातीला स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेस मान्यवरांनी पुष्पांजली अर्पण केली .पाहुण्यांचे स्वागत
मुख्याध्यापिका कुंदा व्यास यांनी केले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवकुमार निर्मळे केले . शेवटी रमण सोनवळ्कर यांनी सर्वाचे आभार मानले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *