अॅड. संतोष पवारांना समाज भूषण पुरस्कार प्रदान

अंबाजोगाई

संत गाडगेबाबा सेवाभावी संस्थांतर्गत आधार माणुसकीचा उपक्रमाचे प्रमुख अॅड. संतोष पवार यांना सोमवारी (ता.१८) तालुक्यातील मुडेगावच्या शिवजयंती उत्सव समितीने ‘सममुडेगावच्या स्कार’ देऊन सन्मानित केले.

अॅड. पवार यांनी बीडसह लातूर जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना लोकसहभागातून आधार देण्याचे काम हाती घेतले आहे. मागील तीन वर्षांपासून या कुटुंबातील मुलांना शिक्षणासाठी व त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे काम ते करतात.
आत्महत्याग्रस्त गरीब कुटुंबातील मुलींचे लग्न लोकसहभागातून लावून देण्याचा उपक्रमही ते राबवितात. याच महिन्यात सारसा (ता.लातूर) येथील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील प्रिती पवार या मुलीचे लग्न मुडेगावच्या विनोद जगतापशी त्यांनी थाटामाटात लाऊन दिले. या विवाह सोहळ्यास परिसरातील
दानशुरांनी मदत केली. परंतू हे घडवून आणण्यासाठी आधार माणुसकीचे प्रमुख संतोष पवार यांचे मोठे योगदान होते. यापुर्वी ही त्यांनी बर्दापूर येथेही विवाह सोहळ्यात पुढाकार घेतला होता.
त्यांच्या या कार्याची दखल घेऊन मुडेगावच्या शिवजयंती उत्सव समितीने त्यांचा हा ‘समाज भूषण पुरस्कार’ देऊन गौरव केला. श्री. पवार यांचेच गुरूवर्य रामकृष्ण पवार यांच्या हस्ते त्यांचा हा सन्मान झाला. यावेळी अनंत निकते, शिवश्री प्रतिक आचार्य, मुख्याध्यापक दिलिप जाधव, श्री. कुलकर्णी, महेश जगताप, धर्मराज जगताप, विशाल जगताप, ज्ञानेश्वर जगताप,उमेश जगताप,अनिल जगताप, अविनाश जगताप, शुभम जगताप, गणेश जगताप, सिद्धेश्वर जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *