स्वा.रा.ती.च्या ओपीडीस स्व.बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्या -शिवसेना शहरप्रमुख गजानन मुडेगावकर यांची मागणी

अंबाजोगाई

येथील स्वा.रा.ती.मधील बाह्य रुग्ण विभागाच्या ईमारतीस स्व.बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्यावे अशी मागणी शिवसेना शहरप्रमुख गजानन मुडेगावकर यांनी स्वा.रा.ती.चे अधिष्ठाता यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे.
या वेळी देण्यात आलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे की, दोन दिवसापूर्वी येथील स्वा.रा.ती.रुग्णालय येथील धर्मशाळा ईमारतीस कै.गोपीनाथ मुंडे साहेब असे नाव देण्यात आले आहे व त्याचे उद्घाटन खा.प्रितमताई मुंडे व स्थानिक आ मदार यांच्या उपस्थितीत करण्यात आले शासकीय ईमारतीस वैयक्तीक कोणाचे नाव देता येत नाही मात्र येथील धर्मशाळेस नाव देण्यात आले तेव्हा ज्या प्रकारे हे नाव देण्यात आले त्यानुसार येथील बाह्य रुग्ण विभागाच्या ईमारतीस ( ओ.पी.डी) स्व
बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्यावे अन्यथा पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे , मराठवाडा संपर्क नेते खा चंद्रकांत खैरे , बीड संपर्क प्रमुख आनंद जाधव यांच्या आदेशाने व जिल्हा प्रमुख सचिन भैया मुळूक,उपजिल्हा प्रमुख बाळासाहेब अंबुरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात येईल असा ईशारा अंबाजोगाई शिवसेना तालुकाप्रमुख अर्जुन वाघमारे व शहरप्रमुख गजानन मुडेगावकर यांनी दिला आहे. हे निवेदन मुख्यमंत्री,शिवसेनाे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे,एकनाथजी शिंदे आरोग्य मंत्री,पालकमंत्री पंकजाताई मुंडे,जिल्हाधिकारी, संचालक आरोग्य विभाग यांना पाठवण्यात आले आहे. यावेळी निवेदन देताना जिल्हा सह संघटक अशोक गाडवे,अॅड. विशाल घोबाळे,गणेश जाधव,राहुल थावरे,अशोक काळे,राजू खरटमोल,नागेश गुजर,राहुल कोंबडे,रवि मुडेगावकर,शशिकांत कदम,श्रावण गायके,आदीसह शिवसैनिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *