विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सा व शास्त्रीय दृष्टीकोण निर्माण करण्यासाठी विज्ञान प्रदर्शन उपयुक्त-शिक्षण व आरोग्य सभापती राजेसाहेब देशमुख

अंबाजोगाई

शालेय विद्यार्थ्यामध्ये विज्ञानाविषयीची आवड,चिकित्सा व शास्त्रीय दृष्टीकोण निर्माण करण्यासाठी अपुर्व विज्ञान प्रदर्शन हे उपयुक्त आहे शिक्षण पद्धती ही प्रश्नांवर आधारीत हवी विद्यार्थ्यांना दररोज नवे प्रश्न पडले पाहिजेत. प्रश्न निर्माण होण्यांसाठी शाळांमध्ये तसे वातावरण हवे वर्गात जिज्ञासा व कुतूहल याला भरपुर वाव व्हावा, घराघरात विज्ञानवाद जोपासला जावा तरच भारत आगामी काळात महासत्ता होईल. पहिल्या दहा मधये भारताचे शास्त्रज्ञ दिसून येतील, नवे शोध लागतील नव्या तंत्रज्ञानामुळे ग्रामिण भागाचा विकास होईल असे प्रतिपादन बीड जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती राजेसाहेब देशमुख यांनी केले. ते अंबाजोगाईत स्वामी विवेकानंद बाल विद्यामंदिर शाळेच्या अपुर्व विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटक म्हणून बोलत होते.

शहरातील आदर्श कॉलनीमध्ये स्वामी विवेकानंद बालविद्या मंदिर ही शाळा विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण देत आहे. या शाळेच्या वतीने गुरूवार दि. 28 फेब्रुवारी रोजी अपुर्व विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. त्याच उद्घाटन बीड जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती राजेसाहेब देशमुख यांनी केले. या कार्यक्रमाला शिक्षणविस्ताराधिकारी पठाण मॅडम, शाळेचे अध्यक्ष संतोष कुलकर्णी, मुख्याध्यापिका स्वरूपाताई कुलकर्णी, केंद्र प्रमुख सोळंके आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
यापुर्वी विज्ञान प्रदर्शनात शाळेच्या सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांनी म्हणजे 550 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला व तब्बल 180 प्रयोग सादर केले. सर्वाधिक विज्ञान प्रयोग सादर करणारी व ते प्रदर्शन भरविणारी शाळा म्हणून या शाळेचा उल्लेख करावा लागेल. विशेष म्हणजे शाळेतील 100 टक्के विद्यार्थ्यांचा या प्रदर्शनात सहभाग होता. इयत्ता 1 ली ते इयत्ता 8 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी चुंबकीय शक्तींपासुन ते सोलार उर्जेपर्यंतचे सर्व प्रयोग प्रदर्शनत मांडले होते. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोण वाढीस लागून विज्ञान विषयाची आवड त्यांच्यात निर्माण व्हावी, विज्ञानाचे प्रयोग त्यांनी स्वतः हातळावेत या उद्देशाने प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.स्वरूपाताई कुलकर्णी यांनी दिली. स्वामी विवेकानंद बाल विद्यामंदिरच्या वतीने आयोजीत अपुर्व विज्ञान प्रदर्शनाचे अभिनंदन व कौतुक करून राजेसाहेब देशमुख यांनी यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. स्वामी विवेकानंद बालविद्यामंदिर ही भविष्यातील शास्त्रज्ञ घडविणारी शाळा असल्याचे ते म्हणाले. यावेळी परिक्षक म्हणून मंजुषा कुलकर्णी, आरती जवळबनकर, सुमंत केदार,अमित आरगडे या विविध शाळेतील शिक्षकांनी काम पाहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *