नगरपरिषद अंबाजोगाई यांच्या वतीने भव्य स्वच्छता अभियान

अंबाजोगाई

डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठाण रेवदंडा (ता.अलिबाग) यांच्या सौजन्याने ; पद्मश्री डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली व नगरपरिषद अंबाजोगाई यांच्या वतीने भव्य स्वच्छता अभियान

रविवार,दि.3 मार्च रोजी डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठाण रेवदंडा (ता.अलिबाग) यांच्या सौजन्याने व पद्मश्री डॉ.अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी 6.30 वाजता श्री.छत्रपती शिवाजी महाराज चौक अंबाजोगाई येथून भव्य महास्वच्छता अभियानाला सुरूवात होणार आहे.

ही स्वच्छता मोहिम स्वच्छ भारत अभियानाचे मा.राज्यपाल यांनी नियुक्त केलेले स्वच्छता दुत पद्मश्री डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी तसेच सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली व नगरपरिषदेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली आहे.या अभियानासाठी सोलापुर,पंढरपुर, उस्मानाबाद व लातुर परिसरातून सुमारे 15 हजार श्रीसदस्य हे स्वच्छतेसाठी अंबाजोगाई शहरात येणार आहेत.प्रतिष्ठाण तर्फे हातमोजे,झाडु, मास्क आदी साहित्य पुरविण्यात येणार आहे.जमा केलेला कचरा हा नगर परिषदेच्या व खासगी वाहनातुन उचलला जाणार आहे व डंपींग ग्राउंडपर्यंत पोहोंचवला जाणार आहे.या अभियानात अंबाजोगाईतील विविध स्वयंसेवी संस्था,शिक्षण संस्था,रोटरी क्लब, बचतगट,एन.एस.एसचे स्वयंसेवक,एन.सी.सीचे छात्र,सामाजिक संघटना,बँका,पतसंस्था,मंडळे यांचे पदाधिकारी सहभागी होणार आहेत. हे अभियान सर्व शहरात राबविले जाणार आहे. नगरपरिषदेच्या वतीने 150 ट्रॅक्टर,जेसीबी, टिप्पर पुरविण्यात येणार आहेत.तरी सर्व अंबाजोगाईकर नागरिकांनी या अभियानात सहभागी व्हावे व अंबाजोगाई शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी आपला अमुल्य सहभाग नोंदवावा असे आवाहन नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ.रचनाताई सुरेश मोदी,उपनगराध्यक्ष सारंग पुजारी,माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी, मुख्याधिकारी डॉ.सुधाकर जगताप, पालिकेचे सर्व सभापती, नगरसेवक,नगरसेविका यांच्या वतीने करण्यात आले आहे.

डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठाणचे लोककार्य..!

डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलेले आहे.डॉ.श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठाणने गेल्या अनेक वर्षांत व्यापक स्वच्छता मोहिमा राबविल्या आहेत.दि.16 नोव्हेंबर 2014 च्या स्वच्छता अभियानाची नोंद ‘लिमका बुक ऑफ रेकॉर्ड’ मध्ये झालेली आहे.प्रतिष्ठाणच्या सौजन्याने आजपर्यंत वृक्ष लागवड,संवर्धन, महाआरोग्य शिबीरे, अपंग व मुकबधीरांना साहित्य वाटप,श्रवण यंत्र वाटप,विद्यार्थ्यांना दप्तर वाटप,पाच हजारा पेक्षा जास्त विहिर व बोअरचे पुन:र्भरण, विहिर व तलावातील गाळ काढणे,जातीचे व इतर दाखले वाटप करणे, पाणपोई निर्मिती,बस थांबे निर्मिती इत्यादी अनेक प्रकारचे सामाजिक उपक्रम डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठाणने गेल्या अनेक वर्षांत राबविले आहेत.

अंबाजोगाईकरांच्या वतीने डॉ.श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठाणचे आभार

अंबाजोगाई शहर स्वच्छ करण्यासाठी डॉ.श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठाणच्या सौजन्याने व नगरपरिषद व अंबाजोगाईकर यांच्या सक्रिय सहभागाने रविवार,दि.3 मार्च रोजी भव्य स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. यामुळे अंबाजोगाई शहरातील स्वच्छता होण्यासाठी हे अभियान उपयुक्त ठरणार आहे. स्वच्छतेच्या बाबतीत अंबाजोगाई कायम आग्रेसर राहिली आहे. अंबाजोगाईचे नागरिक यांचे पालिकेस सतत सहकार्य असून आता डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठाणने स्वच्छतेच्या कामी घेतलेला पुढाकार हा कौतुकास्पद असून पद्मश्री डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी व सचिनदादा धर्माधिकारी,प्रतिष्ठाण व या अभियानासाठी सोलापुर,पंढरपुर, उस्मानाबाद व लातूर परिसरातून येणार्‍या सर्व पंधरा हजार श्रीसदस्य यांचे मी स्वागत करतो व मनःपुर्वक आभार मानतो.

– राजकिशोर मोदी (गटनेते तथा माजी नगराध्यक्ष)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *