शिक्षणाने जीवनात यशप्राप्ती मिळविता येते :- सौ.उषा गित्ते

अंबाजोगाई

संत गाडगेबाबा सेवाभावी संस्था, जोगाई वाडी अंतर्गत आधार माणुसकीचा व वुमन्स डॉक्टर ग्रुप अंबाजोगाई यांच्या संयुक्त विद्येमाने महिला दिनाच्या निमित्ताने शेतकरी आत्महत्याग्रस्त व एच.आय.व्ही कुटुंबातील मातांना पैठणी साडी चेाळी व विद्याथ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम पिताजी सारडा नगरी या ठिकाणी गुरुवारी संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ.उषा किरणजी गित्ते (अध्यक्ष विवेकानंद वेलफेअर ग्रुप )तर प्रमुख पाहुणे डॉ.सुधीर देशमुख (अधिष्ठाता स्वा.रा.ती.म.) श्री.राजकिशोर मोदी (अध्यक्ष काँग्रेस आय) श्री.खडकभावी (प्राचार्य इंजि.महा.) डॉ.राकेश जाधव, श्रीमती केशरबाई सारडा हे उपस्थित होते.
आधार माणुसकीच्या उपक्रमातील 110 मातांना पैठणी साडीचोळी व 225 मुलांना स्कुलबॅग पिताजी सारडा ग्रुपच्या वतीने व वुमन्स डॉक्टर ग्रुप यांनी हळदी कुंकाच्या खर्चाला फाटा देत मुलाच्या शैक्षणिक साहित्यासाठी 30,000 रु ची मदत करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ.उषा गित्ते यांनी महिला व मुलांशी हितगुज साधताना सांगितले की, कुटुंबाची व स्वत;ची प्रगती करावयाची असेल तर शिक्षण घेत असताना कठिण परिश्रम करुन जिवनात यश प्राप्ती निश्चितच मिळवता येते. आधार माणुसकीच्या परिवारामधील गुणवंतमुलांच्या शिक्षणाच्या मदतीसाठी सदैव गित्ते परिवार सोबत राहील.
याप्रसंगी श्री. राजकिशोर मोदी व प्राचार्य खडकभावी यांनी आपल्या मनोगतामध्ये आधार माणुसकीच्या उपक्रमातील मुलांच्या शिक्षणासाठी व त्यांचे आरोग्य व मुलींच्या विवाहासाठी मदत करण्याचे उत्कृष्ट कार्य सुरु आहे, या उपक्रमाच्या पाठिशी आम्ही उभे राहुत. समाजातील दानशुर व्यकतींनी या उपक्रमाच्या पाठिशी रहावे असे आवाहन यावेळी करण्यात आले.
दुष्काळ परिस्थिती असल्याने उपस्थित मान्यवरांचा वृक्ष देवुन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी गुणवंत विद्यार्थिनी कु.अनुष्का सोनवणे हिचा सन्मान करण्यात आला. उपस्थित माता व मुलांना श्रीमती. केशरबाई सारडा यांच्या सहस्त्र दर्शन कार्यक्रमानिमित्त स्नेही भोजन देण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक ॲड. संतोष पवार व डॉ. कांचन आवाड यांनी तर संचलन सौ.ज्योती शिंदे तर आभार श्री. अनंत निकते यांनी मानले .याप्रसंगी वुमन्स डॉक्टर ग्रुपच्या डॉ. वैशाली पोतदार, डॉ.मंगला बाहेती, डॉ.सारीका शिंदे, डॉ. स्वप्नाली सुवर्णकार, डॉ.कल्पना बकरे, सौ. सारीका घुगे, डॉ. संगिता चव्हाण, डॉ.रेखा गुरव, सौ. रश्मी पोतदार, उॉ. स्वाती जाधव, डॉ.अरुणा केंद्रे, डॉ. मनिषा पवार , डॉ. हर्षा काळे उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. धनराज पवार, किरण जाधव, अशोक सुरवसे, संजय सुरवसे, यांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *