अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटनेच्या जिल्हास्तरीय स्पर्धा परिक्षेत 400 विद्यार्थी सहभागी

अंबाजोगाई करिअर मंत्र

अंबाजोगाई (प्रतिनिधी) अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटनेच्या वतीने रविवार,दि.15 सप्टेंबर रोजी घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय ‘Smart Student-2019′ या स्पर्धा परिक्षेत तालुक्यातील विविध शाळांमधील 400 हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले.

अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटनेच्या वतीने जिल्हास्तरीय ‘Smart Student-2019′ ही स्पर्धा परिक्षा अंबाजोगाई शहरात रविवार, दि.15 सप्टेंबर 2019 रोजी सकाळी 11 वाजता मिल्लीया माध्यमिक शाळा,सदर बाजार येथे आयोजीत करण्यात आली होती.ही स्पर्धा परीक्षा जिल्हास्तरीय होती.ही परीक्षा बीड जिल्ह्यातील सर्व तालुक्यात एकाच वेळी घेण्यात आली.अंबाजोगाई तालुक्यातील विविध शाळांमधील सुमारे 400 हुन अधिक विद्यार्थ्यांनी या परीक्षेत सहभाग नोंदवला.सदर स्पर्धा परीक्षा पारदर्शक पद्धतीने घेण्यात आली.
प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत व हस्ते परीक्षा प्रश्नपत्रिका सिलबंद लिफाफा फोडून प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना वितरीत करण्यात आली.यावेळी परिक्षा केंद्रावर विविध क्षेत्रातील मान्यवर व समाजसेवक यांनी प्रत्यक्ष भेट दिली असता अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटनेच्या वतीने त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.पठाण शेराज व सय्यद अर्शद यांनी सर्वांचे आभार मानले.स्पर्धा परीक्षा प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष मास्टर सिद्दिक अहमद यांच्या मार्गदर्शनाखाली अंबाजोगाई येथे पठाण शेराज,सय्यद अर्शद व त्यांचे सहकारी सय्यद तब्बसुम मॅडम,पठाण ईसमत मॅडम,उजमाँ मॅडम,शेख निहाल,हसनात शेख, साखेब शेख,शेख शारेक,मोमीन अरबाज,शेख काशीफ,सय्यद शोएब,आदींनी प्रयत्न केले.

▪▪▪
============================

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *