इतिहास विषयात प्रा.राजाभाऊ भगत यांना पीएच.डी प्रदान

अंबाजोगाई करिअर मंत्र

अंबाजोगाई (प्रतिनिधी) येथील मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात वरीष्ठ विभागात इतिहास विषयाचे अध्यापन करणारे प्रा.राजाभाऊ बंकटराव भगत यांना अमरावती येथील संत गाडगेबाबा विद्यापीठाने नुकतीच पीएच.डी प्रदान केली आहे.

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात वरीष्ठ विभागात इतिहास विषयाचे अध्यापन करणारे प्रा.राजाभाऊ बंकटराव भगत यांनी संशोधन मार्गदर्शक प्रा.डॉ.प्रशांत पी.कोठे (श्री.शिवाजी महाविद्यालय,अकोट) यांच्या मार्गदर्शनानुसार “हैद्राबाद स्वातंत्र्य लढ्यात उत्तर मराठवाड्याचे योगदान सन 1800 ते 1948 (बीड,परभणी परिसराच्या विशेष संदर्भात)” या विषयावर आपला अभ्यासपुर्ण शोधप्रबंध संत गाडगेबाबा विद्यापीठ,अमरावती येथे सादर केला होता.त्याबद्दल त्यांना नुकतीच पीएच.डी पदवी प्रदान करण्यात आली आहे.प्रा.भगत यांनी पीएच.डी प्राप्त केल्याबद्दल त्यांचे मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रकाशदादा सोळंके,सरचिटणीस आ.सतिषभाऊ चव्हाण,महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष रमेशराव आडसकर,डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ.नरेंद्र काळे, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.वनमाला गुंडरे यांच्या सहीत सर्व प्राध्यापक,प्रशासकीय अधिकारी, शिक्षकेत्तर कर्मचारी व सर्व मित्रपरीवार यांनी प्रा.डॉ. राजाभाऊ बंकटराव भगत यांचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *