मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करून लागलीच उपाययोजना चालू कराव्यात- अॅड.माधव जाधव

औरंगाबाद (संभाजीनगर)

औरंगाबाद: मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यामध्ये भीषण दुष्काळी परीस्तीथी निर्माण झालेली आहे. जुलै महिना संपत आला तरीही पाऊस झालेला नाही. अल्पशा पावसा अभावी अजूनही 60% क्षेत्रावर पेरणी झालेलीच नाही. ज्या क्षेत्रावरिल पेरणी झालेली आहे त्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट निर्माण झालेले आहे. गावोगावी पाणी टंचाई भीषण जाणवत असून आजही टँकरने पाणी पुरवठा केला जातोय. या परीस्थीतीत मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतंच चालले आहे. या अस्मानी संकटाने शेतकरी व शेतमजूर बांधव हवालदिल झाला आहे. रोजी रोटिचा प्रश्न निर्माण झाला आहे. या परिस्थीतीत शेतकऱ्यांकडे असलेल्या मुक्या जनावरांच्या व पाळीव प्राण्यांच्या जगवण्याचा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आ वासूण ऊभा आहे. या अस्मानी संकटापासून वाचवण्यासाठी 1) *मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यामध्ये दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना प्रति एकरी 50,000/-( पन्नास हजार) रुपये सरसकट अनुदान ताबडतोब देण्यात यावे.*
2) *दुबार पेरणीची आवश्यकता भासल्यास शेतकऱ्यांना मोफत बी बियाणे , खते पुरवठा करावेत.*
3) प्रत्येक् जिल्हा परिषद गटामध्ये एक स्वतंत्र चारा छावणी व पंचायत समिती गणामध्ये चारा डेपो सुरू करावा.
4) शेळी, मेंढी, गाय, बैल,म्हैस ई. प्राण्यांसाठी चारा छावणी सुरू करून जीवित हानी वाचवावी ही विनंती.
5) दुष्काळ सर्वेक्षण गाववाईज करावे.
6) रोजगार हमी योजना सुरू करावी व स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करून द्यावा.
7) मराठवाड्यातील शेतकरी व शेतमजूर कुटुंबातील विद्यार्थ्यांना सर्व प्रकारची क्षैक्षणिक फीस माफ करण्यात यावी व त्या विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतीगृहावर राहण्याची व जेवणाची सोय शासनाने करावी
8) परळी , अंबाजोगाई तालुक्यातील शेतकऱ्यांना गेल्या वर्षीचा सोयाबीन पिकाचा पीक विमा अद्यापही मिळालेला नसून तो ताबडतोब शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात यावा असा आदेश शासनाने विमा कंपनीला द्यावा.
9) परळी शहराला खडका धरणातून पाणी पुरवठा करावा .
वरिल मागण्या ताबडतोब मान्य कराव्यात असे निवेदन विभागीय आयुक्त साहेब, मराठवाडा विभाग, औरंगाबाद यांना किसान काँग्रेसचे मराठवाडा अध्यक्ष
अॅङ माधव जाधव
यांनी दिले. या वेळी प्रमुख कार्यकर्ते मा.भाऊसाहेब मोगल पाटील जिल्हा अध्यक्ष औरंगाबाद जिल्हा किसान काँग्रेस.व तसेच औरंगाबाद शहर जिल्हा किसान काँग्रेस चे शहर अध्यक्ष मा. सय्यद अब्दुल हमीद भाई,मा.तय्यब सय्यद पटेल विहामांडवेकर *महासचिव* नव नियुक्त खुलताबाद किसान काँग्रेस चे तालुका अध्यक्ष अनिल शंकररावजी नलावडे,औरंगाबाद शहर जिल्हा किसान काँग्रेस चे वरील निवेदण औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयात स्थानिक प्रशासकीय अधिकारी यांना देतांना आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *