तांदूळजा-वांजरखेडा येथील कुटुंबाला मिळाला माणुसकीचा आधार..

लातूर

मौ.तांदुळजा येथील सामान्य कुटुंबातील शामराव गोविंदराव गणगे व सविता शामराव गणगे या पती-पत्नीचे निधन झाले,त्यांच्या पश्चात त्यांना तीन मुली मोठी मुलगी ऋतुजा हिचा नुकताच विवाह झाला आहे, दुसरी मुलगी कु क्षितिजा ही 12 वी विज्ञान शाखेत
शिकतं आहे,तर तिसरी मुलंगी कु ज्ञानेश्वरी ही 10 वी मध्ये आहे,दोन्हीं मुलींचे खुप अभ्यास करून आधीकारी बनण्याचे स्वप्नं आहे.
तसेच मौ.वांजरखेडा येथील अनंत पंडीत कदम या शेतकरी बांधवाने 24।09।2018 रोजी कर्जबाजारी/दुष्काळ परिस्थितीमुळे आत्महत्या केली, त्यांचा पश्यात पत्नी अंजलीताई मुलगा अभिषेक (9वी),मुलगी पुजा (5वी) हे आहेंत.
वरील दोन्ही कुटुंबाची अंबाजोगाई येथिल “आधार माणुसकीचा” उपक्रमांचे प्रमुख ऍड संतोष पवार यांनी भेट घेऊन या कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाची जवाबदारी स्वीकारण्यात आली.
तसेंच वांजरखेडा येथे 21 एप्रिल रोजी अहिल्याबाई सुधाकर गायकवाड यांचे कुडाचे घर जळून खाक झाले,तर 22 एप्रिल रोजी वादळाने श्रीमती सावित्रीबाई बालाजी मगर यांचे पत्र्याचे घर उडुन गेलें, त्यामुळे हे दोन्ही कुटुंब बेघर झाले.ही माहिती “आधार माणुसकीचा”उपक्रमांचे ऍड संतोष पवार यांना श्रीमती नीता मगर(सामाजिक कार्यकर्ते) यांच्या कडून मिळाली असता मुंबई येथील वर्धमान संस्क।र धाम या संस्थेचे श्री राजुभाई शहा हे 14 एप्रिल रोजी तांदुळजा परीसरात पाणी टंचाई निमित्ताने पाणी टॅंकर सूरु करण्यासाठी आले असता, ऍड संतोष पवार,श्रीमती नीता मगर यांनी त्यांना वाजरखेडा येथील कुटुंब बेघर झाले आहे असे सांगितले तेंव्हा रात्रीं 9 वाजता या दोन्ही कुटुंबाना भेटी दिल्या, या वेळीं या कुटुंबाची परिस्थिती पाहून या दोनही कुटुंबाना घर बांधून देण्याचे आश्वासन श्री राजुभाई शहा यांनी दिले, व घर बांधकामं देखभाल जवाबदारी ऍड संतोष पवार व श्री किरण सर, लातूर यांच्यावर सोपविण्यात आली.तसेच या दोनही कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाची जवाबदारी “आधार माणुसकीचा” वतीने स्वीकारण्यात आली.या प्रसंगी श्री ज्ञानेश्वर भिसे,श्री शरद कदम,श्री किरण,श्री चापसी हे उपस्थित होते.
मे 2017 पासून “आधार माणुसकीचा ” उपक्रमांतून बीड/लातूर जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या व एच.आय.व्हि.बाधित 115 कुटुंबातील 230 मुलांचे शिक्षण व आरोग्य तसेच मुलींच्या विवाहासाठी लोकसहभागातून निधी उपलब्ध करून सहकार्य करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *