लातुरात होतेय वाहतुकीची कोंडी; लातूरच्या ट्रॅफिकला जबाबदार कोण ?

लातूर

लातुरात होतेय वाहतुकीची कोंडी; लातूरच्या ट्रॅफिकला जबाबदार कोण ?

लातूर | प्रतिनिधी :

महाराष्ट्रातल्या गर्दीतल्या शहरातलं आणखी एक शहर म्हणून लातूर शहराची ओळख आहे. लातूरमध्ये महाराष्ट्रातूनच नव्हे तर संपूर्ण देशातून लोक लातूर मध्ये येतात, कोणी नोकरीसाठी, कोणी व्यवसाय करण्यासाठी, कोणी शिक्षणासाठी येथे वास्तव्यासाठी आलेलं आहे. लातूरचे पोलीस अधीक्षक हे कर्तव्यदक्ष म्हणून ओळख असलेले असताना, लातुरात छत्रपती शिवाजी महाराज चौक, जुना रेणापूर नाका, नवीन रेणापूर/साई नाका, व मेडिकल परिसर या पट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी होत असल्यामुळे लातूर शहरात येण्यास व लातूर शहरातून बाहेर निघण्यासाठी वाहनचालकांना मोठी कमालीची कसरत करावी लागत आहे, छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे वाहतूक पोलीस आपले कर्तव्य बजावताना दिसतात मात्र जुना रेणापूर नाका आणि साई नाका या ठिकाणी वाहतूक पोलीस क्वचितच दिसतात त्यामुळे दिवसेंदिवस वाहतुकीची कोंडी होतांना दिसत आहे, एकूणच लातूरच्या ट्रॅफिकला जबाबदार कोण असा सवाल वाहन चालक व हैराण झालेले लातूरकर प्रशासनाला करत आहेत, लातूरच्या वाहूतुक कोंडी सारख्या गंभीर समस्येवर लवकरच तोडगा निघाला तर बरे होईल अशी लोकभावना आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *