विद्यार्थ्यांनी प्रत्येक संकटावर मात करून आपले ध्येय साध्य करावे, व्याख्याते, चंद्रकांत हजारे यांचे प्रतिपादन

लातूर

अहिल्यादेवी होळकर सर्वागीण विकास मंडळ,लातुर यांच्या वतीने ‘गोविंदग्रज’शामनगर येथे गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून चंद्रकांत हजारे यांची उपस्थिती होती तर    प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य मधुकर सलगरे होते या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मंडळाचे अध्यक्ष मा. गो.मांडुरके,   अपर जिल्हाधिकारी (सेवानिवृत्त) यांनी भूषविले. चंद्रकांत हजारे पुढे बोलताना ते म्हणाले की सध्याचे युग हे स्पर्धेचे युग आहे आणि या मधे टिकायचे असेल तर अभ्यासामध्ये सातत्य ठेवून  आपले ध्येय साध्य करावे पण यासाठी तुम्हाला सोशल मीडियाचा वापर कमी करावा लागेल नसता सोशल मीडियाच्या अती वापरामुळे तुम्हाला गंभीर परिणाम भोगावे लागतील. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र, सन्मान चिन्ह, व गुलाब पुष्प देऊन गौरविण्यात आले.कार्यक्रमाचे प्रस्ताविक. अॅड.मंचकराव डोणे, यांनी केले. तर आभार डॉ.सिद्राम सलगर यांनी मानले. यावेळी लातूर जिल्हा बँकेचे संचालक सुळ, भारत खंदारे, वैजनाथ कोरे, अँड .राजेश खटके,  सुजित खंदारे, सुभाष लवटे, उध्दव दुधाळे ,आदी. मान्यवर उपस्थित होते यावेळी विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *