कवी राजकुमार त्रिमुखे यांचे सुयश

लातूर

येथील युवा कवी राजकुमार त्रिमुखे यांचे लातूर येथील न्यू सुभद्रा ड्रामा अकॅडमी आयोजित सुभद्रा सोलो कॉम्पिटिशन स्पर्धेमध्ये कविता सादर केल्यामुळे काव्य स्पर्धेत मान्यवरांच्या उपस्थितीत ब्रॉन्झ मेडल देऊन सत्कार करण्यात आला. न्यू सुभद्रा ड्रामा अकॅडमी आयोजित सुभद्रा सोलो कॉम्पिटिशन स्पर्धेचे भालचंद्र ब्लड बँक सभाग्रह लातूर या ठिकाणी आयोजन करण्यात आले होते कार्यक्रम प्रसंगी उपस्थित मान्यवर सुभद्रा ड्रामा अकॅडमी चे संचालक विशाल लामतुरे,

जाधव कॉमर्स अकॅडमीचे संचालक राजाराम जाधव, तसेच प्रमुख पाहुणे स्टार प्रवाह वरील एक टप्पा आऊट शोचे फेम बालाजी सुळ, सोनू डागवले, व अरुण भास्कर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कवी राजकुमार त्रिमुखे यांना अगदी लहानपणापासून कविता व साहित्याची आवड असल्यामुळे त्यांच्या विविध सामाजिक विषयावर कविता आहेत, त्यांच्या या यशाबद्दल त्रिमुखे परिवार, मित्र परिवार व सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *