देशाला अराजकते पासून वाचवा !!!

इतर लेख

भारत देशाची लोकशाही हि जगात आदर्श लोकशाही म्हणून समजली जाते. आदर्श लोकशाहीची मुलभूत व पायाभूत तत्वे म्हणजे स्वातंत्र्य , समता , बंधुता व न्याय हि तत्वे फ्रेंच राज्यक्रांतीने जगाला दिली. त्या

तत्वांवर आधारित भारतीय लोकशाहीची स्थापना लाखो , करोडो , भारतीयांनी प्राणाचे बलिदान देऊन ,शहीद होऊन केली. लोकशाहीची स्थापना झाल्यानंतर लोकशाही मजबूत राहण्यासाठी परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिवराय, शाहू , फुले, यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सामाजिक न्याय, स्वातंत्र्य, समता व बंधुता आबाधित ठेवण्यासाठी या देशाला आदर्श अशा प्रकारची भारतीय राज्यघटना दिली. देश स्वतंत्र होऊन ७० वर्ष पूर्ण झाली.
लोकशाहीच्या प्रमुख स्तंभा पैकी न्यायव्यवस्था अतिशय महत्वाचा स्तंभ आहे. भारतीय न्यायव्यवस्था जगामध्ये आदर्श न्यायव्यवस्था म्हणून समजली जाते. परंतु नुकतेच देशाचे सर्वोच्य न्यायालयातील सरन्यायाधीश श्री . रंजण गोगाई यांच्यावर संपूर्णतः खोटे, चुकीचे आरोप करून न्याय व्यवस्थेला बदनाम करण्याचे व न्यायव्यवस्थेवर अंकुश ठेवण्याचे षड्यंत्र रचले गेले.
देशाच्या सर्वोच्य न्यायालयातील सरन्यायाधीशावर खोटे आरोप करण्यास भाग पाडणारे पडद्यामागे शकुनीमामा या देशाची लोकशाही संपविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. न्यायव्यवस्थे संबंधी अलीकडच्या काळात घडलेल्या काही ठळक घटनांपैकी १) न्यायमूर्ती लोया यांचा गूढ मृत्यू ? खुण ? २) सर्वोच्य न्यायालयातील न्यायाधीशांनी घेतलेली पत्रकार परिषद व त्यामध्ये त्यांच्यावर होणारा अन्याय व दबाव याबद्दलचे त्यांचे जाहीर वक्तव्य व ३) सरन्यायाधीश श्री . रंजण गोगाई यांच्यावर एका निलंबित व गुन्हेगारी पाश्वभूमी असणाऱ्या महिलेने केलेले खोटे व चुकीचे आरोप इ. घटनांवरून न्यायव्यवस्थेला बदनाम करून न्यायव्यवस्थेवर दबाव टाकून या देशाच्या सार्वभौम सत्तेला संपवून टाकून देशात अराजकता निर्माण करण्याचे षड्यंत्र पडद्यामागे शकुनीमामा करत आहेत हेच यातून स्पष्ट होते.
देशाची लोकशाही संपवून या देशात हुकुमशाही निर्माण करण्याचा घाट काही शक्ती रचत आहेत. कारण राजसत्तेवर धर्मसत्तेचे वर्चस्व अलीकडे खूप वाढलेले दिसत आहे. राजसत्ता व धर्मसत्ता ह्या दोन विभिन्न सत्ता आहेत. परंतु या दोन्ही चा संयोग झाला की देशात अराजकता निर्माण होते अशी इतिहासात अनेक उदाहरणे आहेत. जगाच्या इतिहासात फ्रेंच राज्यक्रांती, रशियन राज्य्कांती, पहिले व दुसरे महायुद्ध ,फँसीस्टवाद व नाझीवाद यांचा अभ्यास केल्यास याचे मूळ राजसत्ता व धर्मसत्ता यामध्येच सापडते. फ्रेंच राज्यक्रांती च्या पूर्वी फ्रांस मध्ये राजसत्तेवर धर्मसत्तेचा अंकुश वाढला होता. फँसीस्ट वादाचा जनक मुसोलिनी यानेही धर्मसत्तेला खुश ठेवण्यासाठी राजसत्तेचा दुरुपयोग केला व त्यातूनच दुसऱ्या महायुद्धाची ठिणगी पडली. अशी अनेक उदाहरणे जगाच्या इतिहासात सापडतात.आपल्या देशात सुध्दा स्वातंत्र्यापूर्वी देशावर जेव्हा परकीयांची सत्ता होती, राजेशाही होती. जेव्हा जेव्हा धर्मसत्तेने राजसत्तेवर वर्चस्व गाजवले व राजसत्ता ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न झाला तेव्हा तेव्हा देशात अराजकता निर्माण झालेली आहे. हा इतिहास आहे.देशाला स्वातंत्र्य मिळून 70 वर्ष झाली. परंतु इतक्या कमी काळात देशाने खूप प्रगती जरी केली असली तरी सुध्दा सध्याच्या परीस्तीथीतील काही घटना चिंता निर्माण करणाऱ्या घडत आहेत.
*शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या, उद्योगपतींचे कर्ज बुडवे धोरण, करोडो रुपयांचा घोटाळा* करून देशातील उद्योगपतीचे विदेशात पलायन, गरिबी व श्रीमंती यामधील वाढती दरी, राजकर्त्यांची बेताल वक्तव्य, राजसत्तेवर धर्मसत्तेचा वाढता प्रभाव, *बॉम्बस्फोटा सारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी प्रज्ञासिंह हिचे वक्तव्य, शहीद हेमंत करकरे यांचा अपमान, आरोपी प्रज्ञासिंह हिला लोकसभेच्या उमेदवारीचे सत्ताधारी पक्षाकडून तिकीट, नरेंद्र दाभोळकर , गौरी लन्केश, गोविंद पानसरे या विचारवंतांच्या हत्या, गांधीजींच्या प्रतीमेवर गोळीबार व नथुराम गोडसेचा जयजयकार, पुलवामा येथील अतिरेक्यांचा आमच्या सैनिकावरी*ल हल्ला व त्यात शहीद झालेले आमचे जवान, व त्याप्रती देशाच्या *प्रधानमंत्र्यानी निवडणुकींमध्ये शहिदांना श्रध्दांजली म्हणून भाजपला मतदान करा असा* प्रचार करणे, प्रज्ञासिंह हिचे *शहीद करकरे यांचा मृत्यु झाल्यास माझे सुतक फिटले हे उदगार* , या घटना देशाला अराजकतेकडे नेत आहेत. न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता ही लोकशाही प्रणीत तत्वे सरास पायदळी तुडवली जात आहेत. असे होत राहिले तर निश्चितच शेतकरी कष्टकरी, बहुजन समाज, सर्वसामान्य जनता यांचे जगणे मुश्किल होईल.
धर्माचा ताबा असणाऱ्या मठाधिशांचे आणि राजकारण्यांचे मधुर संबंध असतात. परिणामी एकमेकांचा आधार घेत त्यांचे एकमेकांच्या सोयीने राजकारण सुरू असते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी अलीकडेच वादग्रस्त नरेंद्र महाराजांची भेट घेण्यामागे असेच राजकारण होते. मध्यप्रदेशात ही लोकशाहीच्या पवित्र मंदिरात म्हणजे विधानसभेच्या सभागृहात रामदेव बाबा, श्री. रविशंकर, आचार्य विध्यासागर महाराज यांना आमदारांना मार्गदर्शन करण्यासाठी बोलवलं गेल होत, पंजाब मध्ये शीख धर्म व अकाली दलाची तर पुरती सरमिसळ झाली आहे. मुस्लिम धर्मस्थळ त्यांचे मुल्ला – मौलवी आणि राजकारणात त्यांचे फतवे याही बाबी चिंताजनक आहेत. परंतु *लोकशाहीत राजसत्तेवर धर्मसत्तेने नाही, तर लोकांनीच अंकुश ठेवायचा असतो, अजून इथल्या* लोकांना उमजलेले नाही असे दिसून येते.
राजकारणामध्ये व राजकीय पक्षांमधील धर्मगुरूंचा वाढता प्रभाव, व धर्मसत्तेचे वाढते प्राबल्य हे भारतीय लोकशाहीला धोका निर्माण करणारे आहे. भारतातील धर्माचा ठेका घेतलेल्या अनेक तथाकथीत साधू पुरुषांनी केलेले दुष्कृत्य उघड होऊन ते न्यायलयात सिध्द झाले व न्यायालयाने त्यांना दोशीही ठरविले आहे.आसाराम बापु, रामरहीम, राधे माँ, व ईतर अशी अनेक उदाहरणे आहेत. न्यायालयांनी त्यांचे स्वतंत्र्य अबाधित ठेवण्याचा प्रयत्न करून निपक्षपाती पणे न्यायदान करण्याचा प्रयत्न केल्यामुळेच कीं काय, धर्मसत्तेच्या आदेशानुसार राजकीय दबावाच्या आडून न्यायव्यवस्थेवर खोटे आरोप करून धर्माचे ठेकेदार उद्योगपती, राजकीय गुन्हेगार स्वतः च्या मर्जी प्रमाणे या देशातला कारभार करू पाहत आहेत असे चित्र सध्या निर्माण झाले आहे.
अशा परीस्तीथीत देशाची लोकशाही जिवंत ठेऊन ती भक्कम करण्याची महत्वाची जबाबदारी या देशातील मध्यम वर्गीय समाजाचे घटक म्हणजे वकील, डॉक्टर्स, इंजिनियर, प्राध्यापक यांच्यावर आहे. **बुद्धीजीवी वर्गाच्या जागरूकतेमुळे व सक्रिय सहभागामुळेच जगात क्रांत्या* झालेल्या आहेत. आपल्या देशात सुध्दा बुद्धीजीवी वर्गांनी अधिक जागरूक होणे गरजेचे आहे.
*देश* *अराजकतेपासूण वाचवायचा असेल तर सुरक्षित मध्यम वर्गीय बांधवांनी अधिक जागरूक राहून या देशातील तरुण पिढीला योग्य मार्गदर्शन करून लोकशाही अबाधित ठेवण्यासाठी सक्रिय* सहभाग घेणे आवश्यक आहे.* अन्यथा काळ तुम्हा आम्हला माफ करणार नाही , व अतिशय कष्टातून, असंख्य बलिदानांतून शेकडो वर्षांच्या गुलामगिरीतून मुक्त होऊन मिळविलेले स्वातंत्र्य, समता, बंधूभाव, सामजिक न्याय व त्यावर आधारित लोकशाही संपण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे देशाला अराजकतेच्या खाईत लोटणाऱ्या शक्तींना वेळीच पायबंद घालणे गरजेचे आहे.
*जय हिंद, जय भारत !!!*
आपलाच

 

*अँड. माधव जाधव, अंबाजोगाई* जिल्हा बीड . 9822042774www.madhavj74@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *